मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Justin Bieber च्या गाण्यावर Alia Bhatt चा देसी डान्स; मैत्रिणीच्या लग्नातील जबरदस्त VIDEO VIRAL

Justin Bieber च्या गाण्यावर Alia Bhatt चा देसी डान्स; मैत्रिणीच्या लग्नातील जबरदस्त VIDEO VIRAL

बॉलिवूड   (Bollywood)   अभिनेत्री आलिया भट्ट   (Alia Bhatt)  तिच्या मित्र-मैत्रिणींवर जीव ओवाळून टाकते. ती नेहमी मित्रांसोबत पार्टी असो किंवा नाईट आऊट असो, त्यांच्यासोबतचे प्रत्येक सुंदर क्षण ती एन्जॉय करण्याचा प्रयत्न करते.

  • Published by:  Aiman Desai

मुंबई, 22 डिसेंबर-   बॉलिवूड   (Bollywood)   अभिनेत्री आलिया भट्ट   (Alia Bhatt)  तिच्या मित्र-मैत्रिणींवर जीव ओवाळून टाकते. ती नेहमी मित्रांसोबत पार्टी असो किंवा नाईट आऊट असो, त्यांच्यासोबतचे प्रत्येक सुंदर क्षण ती एन्जॉय करण्याचा प्रयत्न करते. आलिया कधीही आपल्या मैत्रिणींचे कार्यक्रम चुकवत नाही. अलीकडेच आलिया तिची शालेय मैत्रीण मेघना गोयल  (Meghna Goyal Wedding)  हिच्या लग्नात सहभागी झाली होती. या लग्नात तिनं मित्रमैत्रिणींसोबत खूप धमाल केली आहे.

अभिनेत्रींच्या मैत्रिणीच्या हळदी, मेहंदी आणि संगीताचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. नुकताच या लग्नाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये आलिया भट्ट तिच्या मैत्रिणींसोबत जस्टिन बीबरच्या गाण्यावर जबरदस्त डान्स करत असल्याचं दिसून येत आहे.

आलिया भट्ट तिची शालेय मैत्रिण मेघना गोयलच्या लग्नात सहभागी झाली होती. यावेळी तिनं सिल्व्हर चकचकीत ट्रॅडिशनल पोशाख घातला होता. तसेच त्याला मॅचिंग सिल्व्हर ज्वेलरी घातली होती. आलियाचा इंग्रजी गाण्यावरचा देसी डान्स सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. आलियाचा डान्स व्हिडिओ तिच्या फॅन क्लबने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये आलिया भट्ट जस्टिन बीबरच्या गाण्यावर गर्ल गॅंगसोबत डान्स करताना दिसत आहे.या व्हायरल व्हिडिओमध्ये दिसून येत आहे की, आलिया भट्टने सुरुवातीला तिचे केस मागे बांधले होते. परंतु जेव्हा ती डान्स करायला लागते तेव्हा तिचे केस उघडतात. व्हिडिओमध्ये आलिया भट्टची सुंदर स्टाईल पाहायला मिळत आहे. आलिया भट्टच्या डान्स परफॉर्मन्सबद्दल बोलायचे तर हा एक ग्रुप परफॉर्मन्स होता. यामध्ये आलियाच्या इतरही मैत्रिणी डान्स करताना दिसून येत आहेत. ज्यामध्ये ते जस्टिन बीबरच्या पीचेस अँड बेबी गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत.

(हे वाचा:भारती सिंहनं सर्वांसमोर पापाराझींकडे मागितला प्रसूती खर्च; VIDEO VIRAL )

आलिया भट्टसोबत तिच्या मैत्रिणी आकांक्षा रंजन कपूर, अनुष्का रंजन, तान्या साहा गुप्ता, देविका अडवाणी, रिया चॅटर्जी, कृपा मेहता आणि दिशा खटवानी आहेत. हा व्हिडिओ आलियाच्या फॅन क्लब hereforaliaabhatt ने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. चाहत्यांना आणि सोशल मीडिया यूजर्सना आलिया भट्टचा व्हिडिओ खूप पसंत पडत आहे. आलिया भट्टने इन्स्टा स्टोरीमध्ये लग्नानंतरचा तिच्या मैत्रिणीचा एक फोटोही शेअर केला आहे.

First published:

Tags: Alia Bhatt, Entertainment