Home /News /entertainment /

Bigg Boss 15: राखीने पती रितेशसोबत प्रेक्षकांना मूर्खात काढलं? नेटकऱ्यांनी सत्य आणलं समोर

Bigg Boss 15: राखीने पती रितेशसोबत प्रेक्षकांना मूर्खात काढलं? नेटकऱ्यांनी सत्य आणलं समोर

राखी सावंतचा (Rakhi sawant) पती रितेश (Ritesh) सध्या तिच्यासोबत 'बिग बॉस 15' मध्ये दिसत आहे. मात्र, रितेशची पहिली पत्नी आणि मुलासोबतचे त्याचे फोटो सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत.

    मुंबई, 11 डिसेंबर: राखी सावंतचा (Rakhi sawant) पती रितेश (Ritesh) सध्या तिच्यासोबत 'बिग बॉस 15' मध्ये दिसत आहे. मात्र, रितेशची पहिली पत्नी आणि मुलासोबतचे त्याचे फोटो सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत. रितेश सिंग नावाच्या ट्विटर हँडलवर राखीच्या पतीच्या लग्नाचे फोटो तसेच पत्नी आणि मुलाचे फोटो पोस्ट केले आहेत ट्विटच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, 'यासाठी माफ करा मित्रांनो, पण निर्मात्यांनी मला तसे करण्यास सांगितले आहे. मी माझ्या करियर आणि भविष्यासाठी हे केले आहे. त्यामुळे माझ्याबद्दल द्वेष पसरवू नका. मी एक साधा माणूस आहे. 'बिग बॉस'मुळे मला खूप लाजल्यासारखं वाटतं. 'बिग बॉस 15' च्या चाहत्यांनो माफ करा. उघड. हे ट्वीट अधिकृत अंकाऊटवर करण्यात आलेले नाही. वाचा : Katrina Kaif-Vicky Kaushal च्या हळदीचे First Photos आऊट, दोघेही रंगले प्रेमाच्या रंगात रितेश 'बिग बॉस'च्या घरात बंद आहे आणि त्याला असं ट्वीट करता येत नाही. त्यामुळे या ट्वीटवर विश्वास ठेवणे शक्य नाही.अभिनेता आकाशदीप साबीरने रितेशचे फोटो पोस्ट करत लिहिले, 'ही राखी सावंतच्या कथित पतीची पत्नी आणि मुले आहेत. वाचा : Good New! लाफ्टरक्वीन भारती होणार आई, म्हणाली- हेच होतं आमचं मोठं सरप्राइज रितेश कॅमेरामन असल्याच्या अफवा पसरल्या विशेष म्हणजे ही पोस्ट 'द कपिल शर्मा शो'ची खास पाहुणी अर्चना पूरण सिंह हिने लाईक केली आहे. काही दिवसांपूर्वी अफवा पसरल्या होत्या की रितेश हा राखीचा नवरा नसून शोचा कॅमेरामन आहे. Bigg Boss 15, Rakhi sawant, Rakhi sawant Husband Pics, Rakhi sawant and Ritesh, Bigg Boss, Rakhi Husband Photos, राखी सावंत, बिग बॉस 15 रितेशने सांगितली राखीसोबतची त्याची प्रेमकहाणी 'बिग बॉस 15' मध्ये प्रवेश करताना रितेशने राखीसोबतची त्याची प्रेमकथा सांगितली होती. ते व्हॉट्सअॅपद्वारे भेटले होते आणि तिथूनच त्यांची प्रेमकहाणी सुरू झाली होती. अभिजित बिचुकलेने देखील राखीला विचारले होती की. तिने शोमध्ये तिच्या पतीची भूमिका करण्यासाठी रितेशला घेतले आहे का? यावर राखी काहीशी चिढली होती.
    Published by:News18 Trending Desk
    First published:

    Tags: Bigg boss, Bigg Boss OTT, Entertainment, Rakhi sawant

    पुढील बातम्या