मुंबई, 11 डिसेंबर: अभिनेत्री आणि कॉमेडियन भारती सिंह (Bharti Singh) च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पुढील वर्षात भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचिया (Haarsh Limbachiyaa) आई-वडील (Bharti Singh and Haarsh Limbachiyaa Expecting their first baby) बनणार आहेत. हर्ष-भारतीच्या घरी लवकरच चिमुकला पाहुणा येणार आहे. भारती तिच्या कॉमेडीच्या टायमिंगसाठी तसंच दिलखुलास स्वभावासाठी ओळखली जाते. अगदी कमी वेळातच तिने विविध कॉमेडी आणि रिअॅलिटी शो मधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केलं आहे. दरम्यान तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती प्रेग्नन्सी टेस्ट घेत आहे आणि नंतर आनंदाने किंचाळताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना भारती सिंहने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘हे आमचे सर्वात मोठे सरप्राईज होते’. या व्हिडीओत भारती आनंदाने नाचताना देखील दिसत आहे. तिने तिच्या चाहत्यांना ही गुड न्युज देखील तिच्याच स्टाइलमध्ये दिली आहे.
भारती सिंह तशी नेहमीच चर्चेत असते. तिचे अनेक व्हिडीओ देखील व्हायरल होत असतात. सध्या ती तिच्या ट्रान्सफर्मेशनमुळे देखील विशेष चर्चेत आहे. तिच्या फॅट टू फिट प्रवासाचे सर्वजण कौतुक करत आहेत. त्यातच अशी देखील माहिती समोर आली होती की गर्भावस्थेसाठी तिने वजन कमी केले आहे. सध्या ती बेड रेस्ट करत असून काही वेळाने काम सुरू करणार आहे. मीडिया अहवालातील माहितीनुसार, सध्या भारतीने सगळे प्रोजेक्ट्स देखील थांबवले आहेत. ती सध्या लो प्रोफाइल राहत असून त्यामुळे घरातून देखील बाहेर पडत नाही आहे. हे वाचा- महाराष्ट्राचा डिस्कस-थ्रो चॅम्पियन होता CIDफेम ‘दया’, यामुळे वळला अभिनयाकडे भारती लवकरच काही दिवसात तिचे काम पुन्हा सुरू करण्याचीही शक्यता आहे. ब्रेकनंतर ती कपिल शर्माच्या शोमध्ये सहभागी होणार आहे. काही दिवसांपूर्वी भारती सिंहला तिच्या प्रेग्नन्सीविषयी प्रश्न विचारला असता, तिने आपल्या उत्तराने चाहत्यांना गोंधळात टाकले होते. तिने या बातमीची पुष्टी केली नव्हती. हे वाचा- कॉटन साडीमध्ये समंथा फ्लाँट करतेय परफेक्ट फिगर, इंटरनेट सेन्सेशन बनली अभिनेत्री भारतीने दिलेल्या प्रतिक्रियेनुसार, तिने या वृत्ताचे खंडन केले नव्हते. तिने असे म्हटले आहे की- मी याबाबत पुष्टी करणार नाही. मात्र योग्यवेळी याबाबत सविस्तर माहिती देईन. अशा गोष्टी लपून राहत नाही. जेव्हा मला सांगणं योग्य वाटेल तेव्हा स्वत:हून मी हे जाहीर करेन.’ मात्र आता ही बातमी कन्फर्म झाली आहे. आता ही बातमी सर्वांपर्यंत पोहोचली आहे. हा आनंद तिने वेगळ्या स्टाइलने चाहत्यांसह शेअर केला आहे. तिच्या प्रेग्नेंसी टेस्ट दरम्यानचा संपूर्ण व्हिडीओ तिने बनवला आहे. हा व्हिडीओ तिने यूट्यूब चॅनलवर शेअर केला आहे