कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांचा विवाह 9 डिसेंबर रोजी राजस्थानमधील सवाई माधोपूर येथील सिक्स सेन्स फोर्ट बरवाडा येथे झाला. हे या वर्षातील सर्वाधिक चर्चित लग्न ठरलं. दोघांनीही त्यांच्या लग्नाबाबत बरीच गोपनीयता आणि सुरक्षा पाळली होती. लग्नाआधी दोघांच्या नात्याची फारशी चर्चाही झाली नव्हती. दोघांनीही आपलं नातं अगदी खाजगी पद्धतीने जपलं. पण तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की विकी कौशल कॉलेजच्या दिवसांपासून कतरिनावर प्रेम करायचा. त्याची सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला फोटोंच्या माध्यमातून देत आहोत.
कतरिना कैफने 2003 मध्ये 'बूम' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. तेव्हा विकी कौशल शाळेत जात असे. त्यावेळी विकी कौशल फक्त 15 वर्षांचा होता.
त्यावेळी कतरिना कैफ २० वर्षांची होती. स्वत: विकीने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, तो शालेय दिवसांपासून कतरिनाचा चाहता होता.
विकीने मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा तो अॅक्टिंग स्कूलमध्ये होता, तेव्हा तो कॅमेऱ्याला कतरिना कैफ समजून अभिनयाचा सराव करत असे.
विकीनं पुढं सांगितलं की, तो कॅमेरासमोर कतरिना कैफ आणि अक्षय कुमार स्टारर 'सिंग इज किंग'मधील 'तेरी ओर' गाण्यावर परफॉर्म करत असे.
कतरिना कैफ त्याची आवडती अभिनेत्री असल्याचं विकी कौशलनं अनेक मुलाखतीत कबूल केलं होतं. तसेच कतरिनाला त्याच्यासोबत काम करायचं आहे असं करण जोहरनं सांगितल्यावर विकी खूप खुश झाला होता.
तेव्हापासून कतरिना कैफ आणि विकी कौशल जवळ येऊ लागले होते. आणि अनेक पुरस्कार सोहळ्या दरम्यान स्टेजवर एकमेकांसोबत मस्ती करताना दिसले होते.
जेव्हा विकी कौशलनं तिला लग्नासाठी प्रपोज केलं तेव्हा कतरिनानं एक अट घातली की तो तिला जस प्रेम आणि आदर तसंच तिच्या आई, बहीण आणि भावांना आदर आणि प्रेम देईल. विकीने लगेच 'हो' म्हटलं आणि मग दोघांनी लग्न केलं.