• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Bigg Boss15: 'थीम आणि ट्विस्टपासून स्पर्धकांपर्यंत' जाणून घ्या बिग बॉस 15 च्या सर्व डिटेल्स

Bigg Boss15: 'थीम आणि ट्विस्टपासून स्पर्धकांपर्यंत' जाणून घ्या बिग बॉस 15 च्या सर्व डिटेल्स

'बिग बॉस'च्या प्रत्येक सीजनची थीम ही वेगवेगळी असते. तसेच प्रत्येक वर्षी नवनवीन ट्विस्ट यामध्ये निर्माण केले जातात. यावर्षीसुद्धा असंच आहे.

 • Share this:
  मुंबई, 23 सप्टेंबर- 'बिग बॉस'(Bigg Boss) हा अतिशय लोकप्रिय असा रिएलिटी शो आहे. हा शो नेहमीच आपल्या स्पर्धकांमुळे आणि त्यांच्या वादामुळे चर्चेत असतो. त्यामुळे प्रेक्षकांनाही बघायला उत्सुकता वाटते. गेली अनेक दिवस बिग बॉसच्या १५(Bigg Boss 15) व्या सीजनची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. मात्र काही दिवसांत ही प्रतीक्षा संपणार आहे. येत्या २ ऑक्टोबरपासून हा शो आपल्या भेटीला येणार आहे.
  View this post on Instagram

  A post shared by ColorsTV (@colorstv)

  दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा 'बिग बॉस'चा सीजन अतिशय खास असणार आहे. तसेच हटकेसुद्धा असणार आहे. काही दिवसां मेकर्सनी जंगल थीमबद्दल खुलासा केला होता. तसेच सलमान खानचे प्रोमोसुद्धा रिलीज झाले आहेत. त्यामध्ये सलमान खान जंगलमध्ये फिरताना दिसून येतो. तसेच जंगलात अभिनेत्री रेखाचा आवाज आपल्याला ऐकायला मिळतो. त्यामुळे हा सीजन खूपच हटके असणार हे नक्कीच. थीम- 'बिग बॉस'च्या प्रत्येक सीजनची थीम ही वेगवेगळी असते. तसेच प्रत्येक वर्षी नवनवीन ट्विस्ट यामध्ये निर्माण केले जातात. यावर्षीसुद्धा असंच आहे. गेल्यावर्षी म्हणजेच 'बिग बॉस १४' मध्ये थीम होती. 'अब पलटेगा सीन' त्यावेळी प्रत्येक स्पर्धकांना वाटतं होतं की ते सुरक्षित आहेत मात्र अचानक ट्विस्ट येत असे आणि सीनच बदलून जात असे. यावेळी मेकर्सनी जंगल थीम ठरवली आहे. त्यामुळे असं सांगण्यात येत आहे. की स्पर्धकांना घरामध्ये प्रवेश करायच्या आधी घराबाहेर तयार करण्यात आलेल्या जंगलात राहावं लागेल. तसेच त्यांना घरामध्ये प्रत्येक सुख-सुविधा मिळवण्यासाठी भांडावं लागणार आहे. ट्विस्ट- आपल्याला माहिती आहे, की बिग बॉस हा वैयक्तिक खेळण्याचा खेळ आहे. घरामध्ये सहभागी झालेला प्रत्येक स्पर्धक स्वतःसाठी खेळत असतो. मात्र यावेळी सर्व स्पर्धकांना वेगवेगळ्या टीममध्ये विभागण्यात येणार असल्याची दाट शक्यता आहे. घरामध्ये हळूहळू अशा टीम बनतच असतात. हे स्पर्धक स्वतः ठरवत असतात त्यांना पुढे जाण्यासाठी कोणासोबत प्लॅनिंग आणि प्लॉटिंग करायची आहे. नुकताच आलेल्या रिपोर्टनुसार, बिग बॉसची माजी स्पर्धक आणि विजेत्या गौहर खान, रुबिना दिलॆक आणि श्वेता तिवारी आपल्या टीमसोबत घरात एन्ट्री करण्यासाठी तयार आहेत. गेल्यावेळी सुद्धा सिद्धार्थ शुक्लासोबत गौहर खान आणि हिना खानने सिनियर म्हणून घरात एन्ट्री केली होती. (हे वाचा:Bigg Boss15: 'ही' प्रसिद्ध बॉलिवूड गायिका बनणार 'बिग बॉस'ची स्पर्धक) प्रीमियर आणि डेट- बहुप्रतीक्षित आणि सर्वांनाच उत्सुकता लागलेला 'बिग बॉस' चा १५ वा सीजनचा येत्या २ ऑक्टोबरला ग्रँड प्रीमियर होणार आहे. यावेळी सलमान खान सर्व स्पर्धकांची नाव जाहीर करणार आहे. तसेच सोमवार ते शुक्रवार रात्री १०.३० वाजता आणि विकेंडला रात्री ९.३० वाजता कलर्स वाहिनीवर हा शो आपल्याला पाहायला मिळणार आहे. (हे वाचा:Met Gala 2021:मध्ये आमंत्रित केलेल्या एकमेव भारतीय सुधा रेड्डी नेमक्या आहेत....) कोण असणार स्पर्धक- बिग बॉस स्पर्धकांची नावे नेहमीच गुलदस्त्यात ठेवली जातात. यावेळीही तसंच करण्यात आलं आहे. मात्र काही कलाकरांची नवे समोर आली आहेत. बिग बॉस Ott चा स्पर्धक प्रतीक सहेजपालचं नाव यासाठी फायनल सांगितलं जात आहे. तसेच इतर स्पर्धक शमिता शेट्टी, निशांत भट्ट, अक्षरा सिंग यांचीही घरात एन्ट्री होण्याची दाट शक्यता आहे. तसेच शिवांगी जोशी, अर्जुन बिजलानी, बरखा विष्ट, अमित टंडन, रोनित रॉय, करण कुंद्रा, निधी भानुशाली यांचीही नावे खासकरून समोर येत आहेत.
  Published by:Aiman Desai
  First published: