• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • Met Gala 2021:मध्ये आमंत्रित केलेल्या एकमेव भारतीय सुधा रेड्डी नेमक्या आहेत तरी कोण?

Met Gala 2021:मध्ये आमंत्रित केलेल्या एकमेव भारतीय सुधा रेड्डी नेमक्या आहेत तरी कोण?

दर वर्षी न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या मेट गाला या इव्हेंटमध्ये जगभरातले शेकडो सेलेब्रिटी सहभागी होत असतात. वेगवेगळ्या प्रकारची वेशभूषा परिधान करून हे सेलेब्रिटी सहभागी होतात.

 • Share this:
  मुंबई, 22 सप्टेंबर- सुधा रेड्डी हे नाव तुम्ही ऐकलंय का? ऐकलं असण्याची शक्यता जास्त आहे; पण समजा नाव ऐकलं नसलं, तरी त्यांचे फोटोज मात्र सोशल मीडियावर नक्की पाहिले असतील. कोण आहेत या सुधा रेड्डी (Sudha Reddy)? अलीकडे यांचं नाव जास्त चर्चेत आहे आणि सोशल मीडियावर त्यांचे फोटोजही हिट होत आहेत. या सुधा रेड्डी म्हणजे हैदराबादचे अब्जाधीश उद्योगपती पी. व्ही. कृष्ण रेड्डी (P. V. Krishna Reddy) यांच्या पत्नी आणि समाजसेविका आहेत.
  सुधा रेड्डी स्वतःही उद्योजक असून, मेघा इंजिनीअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (Megha Engineering and Infrastructure Limited - MEIL) या कंपनीच्या संचालिका आहेत. त्याशिवाय त्या समाजसेविका म्हणूनही कार्यरत आहेत. या वर्षी त्या बऱ्याच चर्चेत आल्या मेट गाला 2021 (Met Gala 2021) या न्यूयॉर्कमधल्या (New York) सोहळ्यातल्या सहभागामुळे. 'झी न्यूज'ने याबद्दलचं वृत्त दिलं आहे. दर वर्षी न्यूयॉर्कमध्ये होणाऱ्या मेट गाला या इव्हेंटमध्ये जगभरातले शेकडो सेलेब्रिटी सहभागी होत असतात. वेगवेगळ्या प्रकारची वेशभूषा परिधान करून हे सेलेब्रिटी सहभागी होतात. त्यातल्या वेगळ्या आणि आकर्षक वेशभूषांचं कौतुक होतं आणि ते सेलेब्रिटी बराच काळ चर्चेतही राहतात. सध्याच्या जमाना सोशल मीडियाचा असल्यामुळे सोशल मीडियावर अशा सेलेब्रिटींचे फोटो व्हायरल होत राहतात. सुधा रेड्डी मेट गाला 2021मध्ये सहभागी होण्यासाठी खासगी जेट विमानाने न्यूयॉर्कला पोहोचल्या होत्या. त्यांनी या गालामध्ये परिधान केलेल्या ड्रेसची खूप चर्चा झाली. त्यांचा गाउन (Gown) हाती तयार करण्यात आला होता. तो गाउन प्लंजिंग नेकलाइन आणि बॅकलेस डिझाइनचा होता. त्याच्या शोल्डर्सवर गोल्डन पॅचेस होते. तसंच खालच्या बाजूला स्लिटसह लाँग टेल देण्यात आली होती. नामवंत फॅशन डिझायनर लेबल फाल्गुनी शेन पीकॉकने हा ड्रेस तयार केला होता. (हे वाचा:'सर्व धर्म सम भाव'चा संदेश देत Sara Ali Khanने काश्मिरमधून शेअर केले PHOTO) या ड्रेसची तर चर्चा झालीच; पण सुधा रेड्डींच्या हातात असलेल्या विशेष पर्सचीही चर्चा झाली. त्यांच्या हातात गणपतीच्या मूर्तीच्या आकाराची क्लच पर्स होती. मेट गाला 2021मध्ये सुधा रेड्डी यांनी रेड कार्पेटवर (Red Carpet) जी कमाल करून दाखवली, ती करायला दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्रा यांसारख्या अभिनेत्रींनाही अनेक वर्षं लागली होती. या वर्षी मेट गालामध्ये आमंत्रित केल्या गेलेल्या सुधा रेड्डी या एकमेव भारतीय होत्या. 14 सप्टेंबर रोजी हा सोहळा पार पडला. न्यूयॉर्क शहरातल्या मेट्रोपॉलिटन म्युझियम ऑफ आर्ट्स कॉश्च्युम इन्स्टिट्यूटसाठी निधी उभा करण्याकरिता दर वर्षी मेट गालाचं आयोजन केलं जातं. (हे वाचा:Bigg Boss15: 'ही' प्रसिद्ध बॉलिवूड गायिका बनणार 'बिग बॉस'ची स्पर्धक) हा अविस्मरणीय अनुभव होता. सुधा रेड्डी फाउंडेशनतर्फे भविष्यात आयोजित केल्या जाणाऱ्या सोशियो-इकॉनॉमिक वेल्फेअर कॅम्पेन्समध्ये सहभागी होण्यास उत्सुक असलेल्या अनेक व्यक्तिमत्त्वांची या प्रसंगी भेट झाली, असं सुधा रेड्डी यांनी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. सुधा रेड्डी यांचे पती पी. व्ही. रेड्डी यांचा भारतातल्या सर्वांत यशस्वी उद्योगपतींमध्ये समावेश होतो. मेघा इंजिनीअरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (Megha Engineering and Infrastructure Limited - MEIL) या कंपनीचे ते व्यवस्थापकीय संचालक आहेत.
  First published: