मुंबई, 5 मे : टीव्ही शो बिग बॉस 13 काही महिन्यांपूर्वीच संपल्यानंतर आता प्रेक्षकांना नव्या सीझनची उत्सुकता लागून राहिली आहे. भांडण, प्रेम, मैत्री आणि वाद असं फुल एन्टरटेन्मेंट पॅकेज असलेला हा शो प्रेक्षकांनी आता पर्यंत सर्वाधिक पसंत केलेला शो ठरला आहे. नुकताच पार पडलेला 13 वा सीझन सर्वाधिक हिट राहिला आहे. हा सीझन टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्लानं जिंकला. यावेळी या सीझनमध्ये सर्व सेलिब्रेटींना एंट्री देण्यात आली होती. त्यानंतर आता लगेचच 14 व्या सीझनची तयारी सुरू झाली आहे. पण यावेळच्या सीझनसाठी बिग बॉस हाऊसचं लोकेशन मात्र बदलण्यात आल्याचं बोललं जात आहे. याशिवाय काही स्पर्धकांची नावं सुद्धा समोर आली आहेत.
बिग बॉस 13 मध्ये शहनाज गिल, सिद्धार्थ शुक्ला, रश्मि देसाई, आसिम रियाज, आरती सिंह, पारस छाब्रा आणि माहिरा शर्मा यांच्यासह आणखी काही स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. ज्यांनी प्रेक्षकांचं खूप मनोरंजन सुद्धा केलं. त्यानंतर आता नव्या सीझनची तयारी सुरू झाल्याचं बोललं जात आहे. एवढंच नाही तर या सीझनचं घर मुंबईमध्ये असणार नाही असंही बोललं जात आहे. बिग बॉस हाऊसचं लोकेशन बदलून पुन्हा एकदा गोव्यात या सीझनचं शूट होणार असल्याचं बोललं जात आहे. मुंबईच्या लोखंडवाला भागाचं 13 व्या सीझनचं शूट झालं होतं. मात्र 14 व्या सीझनचं लोकेशन बदलून साऊथ गोवामध्ये शिफ्ट करण्यात आलं आहे.
याशिवाय 14 व्या सीझनच्या पहिल्या स्पर्धाकाच्या नावाचा खुलासा झाल्याचं बोललं जात आहे. एनडीटीव्हीनं दिलेल्या वृत्तानुसार मॉडेल, अभिनेत्री आणि सिंगर पूनम कारेकर बिग बॉस 14 ची पहिली स्पर्धक असल्याचं बोललं जात आहे. याशिवाय या सीझनमध्ये जास्मिन भसीन, अलिशा पवार आणि करण कुंद्रा यांची नावंही या सीझनसाठी चर्चेत आहेत.
पुनम कारेकर लवकरच एका सिनेमात दिसणार आहे. हा सिनेमा माजी संरक्षण मंत्री आणि गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या जीवनावर आधारित आहे. या सिनेमात एका पत्रकाराची भूमिका साकारणार आहे. जिने 20 वर्षांपूर्वी पर्रिकरांची मुलाखत घेत आपल्या करिअरची सुरुवात केली होती.
राकेश रोशन यांनी ऋषी कपूरना दिल्लीत न जाण्याची दिली होती ताकिद आणि तिथेच...
पाणीपुरी कशी खायची? विकी कौशल देतोय धडे, VIDEO पाहून आवरणार नाही हसू
या ठिकाणी झालं होतं नीतू-ऋषी कपूर यांचं लग्न, 40 वर्षांनी समोर आला UNSEEN PHOTO मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.