Home /News /entertainment /

या ठिकाणी झालं होतं नीतू-ऋषी कपूर यांचं लग्न, 40 वर्षांनी समोर आला इनव्हिटेशन कार्डचा PHOTO

या ठिकाणी झालं होतं नीतू-ऋषी कपूर यांचं लग्न, 40 वर्षांनी समोर आला इनव्हिटेशन कार्डचा PHOTO

40 वर्षांनंतर नीतू आणि ऋषी कपूर यांच्या लग्नाच्या इनव्हिटेशन कार्डचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.

  मुंबई, 5 मे : बॉलिवूडचे चिंटू म्हणजेच दिग्गज अभिनेता ऋषी कपूर यांनी 30 एप्रिलला जगाचा निरोप घेतला. 29 एप्रिलला त्यांची तब्येत अचानक बिघडल्यानं त्यांना मुंबईच्या एनएच रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र अनेक प्रयत्न करुनही डॉक्टर त्यांना वाचवू शकले नाहीत. मात्र त्यांच्या निधनानंतर त्यांचे अनेक जुने फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत. अशात आता 40 वर्षांपूर्वीच्या त्यांच्या लग्नाच्या इनव्हिटेशन कार्डचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. नीतू सिंह आणि ऋषी कपूर यांच्या लव्हस्टोरी बद्दल तर सर्वांनाच माहित आहे. या दोघांनी 23 जानेवारी 1980 मध्ये लग्न केलं होतं. ज्याचं कार्ड आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हे या दोघांच्या लग्नाच्या रिसेप्शनचं इनव्हिटेशन कार्ड आहे. या व्हायरल झालेल्या कार्डनुसार या दोघांच्या रिसेप्शनचा वेन्यू आरके स्टुडिओ होता. त्यांच्या लग्नात अनेक बॉलिवूडचे अनेक दिग्गज सेलिब्रेटी सहभागी झाले होते.
  लग्नानंतर नीतू कपूर यांनी त्यांचं यशाच्या शिखरावर असलेलं सिने-करिअर सोडून दिलं होतं. अर्थात त्यानंतर यांच्या जीवनात अनेक चढ-उतार आले मात्र या दोघांनीही कधीच हार मानली नाही. असं म्हटलं जातं की एक वेळ अशी होती की हे दोघं एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते. मागच्या वर्षी जेव्हा ऋषी कपूर कॅन्सरवर उपचार घेत असताना नीतू पूर्णवेळ त्यांच्यासोबत होत्या. काही दिवसांपूर्वीच नीतू यांनी ऋषी कपूर यांचा एक जुना फोटो शेअर केला होता. ज्यासोबत त्यांनी एक इमोशनल कॅप्शन सुद्धा दिलं होतं. आमच्या कथेचा शेवट झाला असं त्यांनी या कॅप्शनमध्ये लिहिलं होतं. यासोबत त्यांनी हार्ट इमोजी पोस्ट केला होता. याशिवाय ऋषी कपूर यांच्या प्रेअर मीटचे फोटो सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
  View this post on Instagram

  Lifelong relationship Friendship ..

  A post shared by neetu Kapoor. Fightingfyt (@neetu54) on

  मागच्या दोन वर्षांपासून ऋषी कपूर कॅन्सरशी झुंज देत होते. 2019 च्या अखेरीस ते अमेरिकेत उपचार घेऊन भारतात परतले होते. दरम्यानच्या काळात त्यांनी ते नेमकं कोणत्या आजारावर उपचार घेत आहे मात्र त्यांनी प्रसारमाध्यमांपासून लपवून ठेवलं होतं. त्यानंतर फेब्रुवारीमध्येही त्यांची तब्येत अचानक बिघडली होती. ऋषी कपूर आज या जगात नसले तराही त्यांच्या आठवणी मात्र प्रत्येक प्रेक्षकाच्या मनात आजही तशाच आहेत. (संपादन- मेघा जेठे.)
  Published by:Megha Jethe
  First published:

  Tags: Bollywood, Rishi kapoor

  पुढील बातम्या