मुंबई, 1 मे- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने(Covid 19 second Wave) देशात थैमान घातला आहे. कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सर्वसामान्यांप्रमाणे कलाकारसुद्धा यापासून वाचले नाहीत. बॉलीवूड (Bollywood Star) तसेच छोट्या पडद्यावरील (Tv Star) अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. आत्ता त्यात नवीन एका नावाची भर पडली आहे. ‘बिग बॉस 14'ची विजेती(Bigg 14 Winner) अभिनेत्री रुबिना दिलैकला(Rubina Dilaik Corona Positive) सुद्धा कोरोनाची लागण झाली आहे. रुबिनाने नुकताच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून पोस्ट करत याबद्दलची माहिती दिली आहे. रुबिनाला लागण कशी झाली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. रुबिनाने आपल्या संपर्कात आलेल्या सर्व लोकांना आपली कोरोना चाचणी करून घेण्याची विनंती केली आहे.
View this post on Instagram
‘बिग बॉस 14’ मुळे लोकप्रियतेच्या शिखरावर पोहचलेली रुबिना दिलैकने म्हटलं आहे, ‘मी नेहमी प्रत्येक गोष्टीची सकारात्मक बाजू पाहते, यामध्ये सुद्धा तसचं आहे. मी हा विचार करत आहे, आता एका महिन्यानंतर मीसुद्धा ‘प्लाज्मा’ डोनेट करण्यास पात्र ठरेन’. माझा रिपोर्ट पॉजिटीव्ह आला आहे. त्यामुळे येत्या 17 दिवस मी होम क्वारंटाईन असणार आहे. तसेच या 5 ते 6 दिवसांत जे लोक माझ्या संपर्कात आले आहेत, त्यांनी कृपया आपली चाचणी करून घ्यावी’.
रुबिनाने सोशल मीडियावरून ही माहिती कळवताचं रुबिनाचे मित्र आणि सह-कलाकार चिंता करू लागले आहेत. बिग बॉसच्या घरामध्ये रुबिनाची मैत्रीण झालेली निक्की तांबोळीने कमेंट करत तिला काळजी घेण्यास सांगितलं आहे. तसेच रुबिनाला आपली बहीण समजणारा अभिनेता अली गोनीने सुद्धा पोस्ट करत तिच्यासाठी प्रार्थना केली आहे.
(हे वाचा: धर्मेंद्र-हेमामालिनी यांच्यातील अंतर वाढलं ? गेली एकवर्ष आहेत विभक्त....)
मात्र रुबिनाने आपला पती आणि अभिनेता अभिनव शुक्लाबद्दल सध्या कोणतीच माहिती दिलेली नाहीय. त्यामुळे चाहते अपेक्षा करत आहेत, की अभिनव ठीक असावा.
(हे वाचा:अच्छा तो हम चलते हैं…; लॉकडाऊनला वैतागून अभिनेत्रीनं सोडला महाराष्ट्र)
रुबिनाच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर, ती सध्या कलर्स वाहिनीवरील ‘शक्ती’ या मालिकेमध्ये काम करत आहे. तसेच बिग बॉस नंतर ती आपल्या पहिल्या ‘मरजानियां’ या अल्बममध्ये झळकली होती. तसेच पारस छाब्रासोबत ‘गलत’ हा अल्बमही नुकताच रिलीज झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Big boss 14 winner, Bigg boss, Coronavirus, Marathi entertainment, Rubina dilaik, Tv actress