सध्या महाराष्ट्रामध्ये कोरोनाची दुसरी लाट आली आहे. राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतंच चालली आहे. (radhika madan/Instagram)
2/ 10
त्यामुळं वाढत्या कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारनं लॉकडाऊनचा पर्याय स्विकारला. मात्र या लॉकडाउनचा मोठा फटका सिनेसृष्टीला बसला आहे. (radhika madan/Instagram)
3/ 10
अनेक मोठे चित्रपट लाबणीवर गेले आहेत. शिवाय जे चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज आहेत त्यांना सिनेमागृह उपलब्ध नाही. (radhika madan/Instagram)
4/ 10
त्यामुळं या लॉकडाउनच्या स्थितीला वैतागून अखेर राधिका मदन हिनं महाराष्ट्र सोडण्याचा निर्णय घेतला आहे. (radhika madan/Instagram)
5/ 10
राधिका मुळची दिल्ली येथे राहणारी आहे. बॉलिवूड चित्रपटांच्या निमित्तानं ती मुंबईत राहात होती. परंतु लॉकडाउनमध्ये घरात एकटं बसण्याऐवजी तिनं कुटुंबासोबत दिल्लीत राहण्याचा निर्णय तिनं घेतला आहे. (radhika madan/Instagram)
6/ 10
आज राधिकाचा वाढदिवस आहे. 26 व्या वाढदिवसाच्या निमित्तानं तिनं एक पोस्ट शेअर केली होती. या पोस्टद्वारे तिनं महाराष्ट्र सोडल्याची माहिती आपल्या चाहत्यांना दिली. (radhika madan/Instagram)
7/ 10
दरम्यान देशभरातील चाहत्यांनी राधिकावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. तिनं एकामागून एक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम करावं अशी इच्छा तिचं चाहते व्यक्त करत आहेत. (radhika madan/Instagram)
8/ 10
राधिकानं 2018 साली पटाखा या चित्रपटातून आपल्या करिअरची सुरुवात केली होती. त्यानंतर तिनं मर्द को दर्द नही होता या चित्रपटात काम केलं. (radhika madan/Instagram)
9/ 10
परंतु तिला खरी लोकप्रियता मिळाली ती अंग्रेजी मिडिअम या चित्रपटामुळं. या चित्रपटात तिनं सुपरस्टार इरफान खान यांच्या मुलीची भूमिका साकारली होती. (radhika madan/Instagram)
10/ 10
येत्या काळात ती फिल्स लाईक इश्क आणि रे या वेब सीरिजवर झळकणार आहे. (radhika madan/Instagram)