मुंबई, 30 एप्रिल- बॉलीवूड (Bollywood) मधील प्रसिद्ध ज्येष्ठ अभिनेता धर्मेंद्र (Dharmendra) सोशल मीडियावर (Social Media) खूपचं सक्रिय असतात. गेल्या कित्येक दिवसांपासून आपण बघत आहोत, की धर्मेंद्र मुंबईपासून (Mumbai) लांब आपल्या फार्महाउसवर एकटेच राहात आहेत. त्यामुळे लोकांच्या मनात एकचं प्रश्न आहे, धर्मेंद्र आणि हेमामालिनी (Hemamalini) यांच्यामध्ये असं काय झालं आहे की त्यांना दूर राहावं लागत आहे. एक वर्षापासून अधिक काळ हे दोघे एकमेकांना भेटलेसुद्धा नाहीत. मात्र आत्ता हेमामालिनी यांनी यावर मौन सोडलं आहे. आणि त्यांनी सांगितलं की नेमकं काय झालं आहे ज्यामुळे त्यांना धर्मेंद्र यांच्या पासून लांब राहावं लागत आहे. गेली वर्षभर कोरोनाने थैमान घातला आहे. त्यामुळे लोकांना एकमेकांपासून दूर राहावं लागत आहे. असचं काहीसं झालंय ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र आणि अभिनेत्री हेमामालिनी यांच्यासोबत. कोरोनामुळे धर्मेंद्र आणि हेमामालिनी गेली वर्षभर एकमेकांपासून दूर आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघून धर्मेंद्र मुंबईपासून लांब आपल्या फार्महाउसवर राहायला गेले आहेत.
स्पॉटबॉयला दिलेल्या एका मुलाखतीत हेमामालिनी यांनी म्हटलं आहे, ‘सध्या हे त्यांच्या सुरक्षतेसाठी खुपचं चांगलं आहे. आम्ही एकत्र राहण्यापेक्षा जास्त महत्व त्यांच्या तब्बेतीला देत आहोत. हा आपल्या सर्वांसाठी एक खूपचं कठीण काळ आहे. यामध्ये जर आपल्याला आपलं आरोग्य टिकवायचं असेल तर आपण मजबूत होणं महत्त्वाचं आहे. आणि त्यासाठी असे काही त्याग करावेच लागतील’. (हे वाचा: ‘खरंच लस घेताय की उगाच थापा मारताय’; निया शर्मा बॉलिवूड सेलिब्रिटींवर संतापली ) काही दिवसांपूर्वी धर्मेंद्र यांनी कोरोनाची लस घेतली होती. सोशल मीडियावर एक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यामध्ये धर्मेंद्र covid 19 vaccine घेताना दिसून येत होते. यामध्ये त्यांनी कोरोनाशी लढा देण्यासाठी Vccine आणि मास्क अत्यंत महत्वाचं असल्याचं म्हटलं होतं. तसेच सामजिक अंतर सुद्धा ठेवणं आवश्यक असल्याचं म्हटलं आहे. तसेच vaccine लहान मुलांनासुद्धा देण्यात यावी अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. (हे वाचा: सोनू सूदच्या मदतीचा ओघ सुरुच; संपूर्ण गावाला पुरवणार अन्नधान्य ) धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांची लव्हस्टोरी एका चित्रपटासारखीच आहे. धर्मेंद्र यांचं पहिलं लग्न प्रकाश कौर यांच्यासोबत झालं होतं. त्यांनतर त्यांनी हेमामालिनी यांच्याशी लग्नं केलं होतं.