बॉलिवूडमध्ये कोरोनाचं थैमान! एकाच दिवशी दोन प्रसिद्ध अभिनेत्रींनी आपल्या भावाला गमावलं

बॉलिवूडमध्ये कोरोनाचं थैमान! एकाच दिवशी दोन प्रसिद्ध अभिनेत्रींनी आपल्या भावाला गमावलं

(Bigg Boss 14) फेम निक्की तांबोळी (Nikki Tamboli) आणि अभिनेत्री पिया बाजपेयी(Pia Bajpeyi) या दोघींनी कोरोनामुळे आपल्या भावांना गमावलं आहे.

  • Share this:

मुंबई, 4 मे: कोरोनाने (Coronavirus)  अक्षरशः थैमान घातलं आहे. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. सर्वसामान्य लोक असो किंवा कलाकार प्रत्येकाला कोरोनाचा फटका बसत आहे. कोरोनामुळे दिवसेंदिवस परिस्थिती बिघडत चालली आहे. एकीकडे रुग्णांचा आकडा वाढत आहे. तर दुसरीकडे मृतांचा. कोरोनामुळे अनेक बॉलीवूड कलाकरांनी जीव गमावला(Bollywood stars death) आहे. तर कित्येक कलाकारांनी आपल्या जवळच्या व्यक्तींना गमावलं आहे. अशीच दुखद माहिती समोर आली आहे. 'बिग बॉस 14'(Bigg Boss 14) फेम निक्की तांबोळी (Nikki Tamboli) आणि अभिनेत्री पिया बाजपेयी(Pia Bajpeyi)  या दोघींनी कोरोनामुळे आपल्या भावांना गमावलं आहे.

‘बिग बॉस 14’ मुळे प्रसिद्धीच्या झोतात आलेली अभिनेत्री निक्की तांबोळीने नुकताच आपल्या भावाला गमावलं आहे. निक्कीचा भाऊ अवघ्या 29 वर्षांचा होता. त्याला कोरोनाची लागण झाली होती. गेली 20 दिवस तो कोरोनाशी लढा देत होता. मात्र आज अखेर त्यांचा हा लढा थांबला. निक्कीने आपल्या इन्स्टाग्रामवरून ही माहिती दिली आहे. त्याचबरोबर तिने एक भावुक पोस्ट सुद्धा शेयर केला आहे.

निक्कीने आपल्या इन्स्टाग्रामवर सांगितलं आहे, की त्याचा भाऊ अनेक शारीरक समस्यांनी त्रस्त होता. त्याला टीबी होता, त्याचं एक फुफ्फुस निष्क्रिय होतं, त्याला निमोनिया झाला होता, आणि 20 दिवसांपूर्वी त्याला कोरोनाची लागणससुद्धा झाली होती.

तर दुसरीकडे दाक्षिणात्य आणि हिंदी चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री पिया बाजपेयी हिने देखील आपल्या भावाला गमावलं आहे. पियाच्या भावाला सुद्धा कोरोनाची लागण झाली होती. पियाने स्वतः ट्वीट करत आपल्या भावाच्या निधनाची माहिती सर्वांना दिली आहे.

याआधी पियाने सोशल मीडियावरून मदतसुद्धा मागितली होती. मदत मागत पियाने रुग्णालयात बेड आणि ऑक्सिजनची मागणी केली होती. माझ्या भावाची अवस्था चिंताजनक असल्याचं सुद्धा सांगितलं होतं. पियाही उत्तर प्रदेश मधील फारुक्खाबाद जिल्ह्यातील कायमगंज या ठिकाणी राहते. पियाने भाजप नेता तेजिंदर पाल बग्गा यांच्याकडे सुद्धा मदतीचा हात मागितला होता. मात्र कोणतीच मदत तिला मिळू शकली नव्हती.

(हे वाचा:आवडत्या चित्रांचा लिलाव करून अभिनेत्रीने कोरोनाग्रस्तांसाठी उभा केला निधी  )

2014 मध्ये पियाने सतीश राजवाडे यांच्या ‘मुंबई दिल्ली मुंबई’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं आहे.

Published by: Aiman Desai
First published: May 4, 2021, 3:46 PM IST

ताज्या बातम्या