आवडत्या चित्रांचा लिलाव करून अभिनेत्रीने कोरोनाग्रस्तांसाठी उभा केला निधी

आवडत्या चित्रांचा लिलाव करून अभिनेत्रीने कोरोनाग्रस्तांसाठी उभा केला निधी

टेलिव्हिजन अभिनेत्री दलजीत कौरने तिची काही चित्रं विकून कोरोनाग्रस्तांसाठी निधी उभा करण्याचं ठरवलं आहे.

  • Share this:

मुंबई 4 मे : सध्या देशातील कोरोनाची परिस्थिती (corona pandemic) ही फारच बिकट झाली आहे. आरोग्य व्यवस्था आणि वैद्यकीय सुविधा अपुऱ्या पडत आहेत. त्यासाठी अनेकांनी आता मदतीचा हात पुढे केला आहे. यात अनेक सेलिब्रिटींचाही समावेश आहे. अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) हा मागील वर्षभरापासून गरजूंना मदत करत आहे. यात आता प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री दलजीत कौरचा (Daljit Kaur) ही समावेश झाला आहे. दलजीतने तिची काही चित्र विकून हा निधी उभा करण्याचं ठरवलं आहे.

हिंदी टेलिव्हिजनवरील नच बलिए (Nach Baliye), बिग बॉस (Big boss 13)  या प्रसिद्ध कार्यक्रमांमधून घराघरात पोहोचलेली दलजीत नेहमीच काहीना काही कारणाने चर्चेत असते. आता तिने कोरोनाग्रस्तांना केलेल्या मदतीमुळे ती चर्चेत आली आहे. दलजीतने सोशल मीडियावर पोस्ट करत ही माहिती दिली.

तिने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर दोन सुंदर चित्रं पोस्ट केली, जी तिने काढली होती, तिने असंही लिहिलं आहे की, “जर माझ्याकडे अजून चित्रं असती, तर अजून मोठी मदत होऊ शकली असती. मला माहित नाही सध्या काय करणं योग्य आहे. आज हजारो लोक आयुष्याशी लढा देत आहेत आणि त्यांना मदतीची गरज आहे. अशावेळी मला वाटतें की माझ्या या चित्रांचा लिलाव करून, ज्यांना त्वरित मदतीची गरज आहे त्यांच्यासाठी मी थोडीफार आर्थिक मदत नक्कीच उभी करू शकते.”

(वाचा - महाराष्ट्राबाहेर शूटिंग करताना काय त्रास होतो? मयुरी देशमुखनं सांगितला अनुभव)

पुढे दलजीत म्हणते, “ही चित्रं मी अत्यंत प्रेमाने काढलेली असून माझ्या घरीच कित्येक काळापासून आहेत. पण आता त्यांचा योग्य वापर करण्याची वेळ आली आहे...जास्तीत जास्त किंमतीमध्ये ही चित्रं विकून त्यातून मिळणारे पैसे दान करण्याचा माझा हेतू आहे.”

दलजीतच्या या अनोख्या निर्णयाचं अनेकांकडून स्वागत होत आहे. तिच्या हजारो चाहत्यांनी तिला याविषयी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. तर काही सेलिब्रिटींनीही तिच्या या पोस्टवर कमेंट करत तिला पाठिंबा दिला आहे.

Published by: News Digital
First published: May 4, 2021, 2:01 PM IST

ताज्या बातम्या