मुंबई, 06 फेब्रुवारी : बिग बॉसचा 13 वा सीझन आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. यंदाच्या संपूर्ण सीझनमध्ये सिद्धार्थ शुक्ला सर्वाधिक चर्चेत राहिला. सध्या एकीकडे तो या सीझनच्या विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. तर दुसरीकडे घरातील सदस्यांसोबत त्याची भांडणं चर्चेचा विषय ठरत आहेत. अशातच आता सिद्धार्थ शुक्लाच्या अटकेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ज्यात मुंबई पोलीस सिद्धार्थला पोलिस व्हॅनमध्ये बसवताना दिसत आहेत. या सीझनमध्ये अनेदा मेकर्सनी सिद्धार्थला मेकर्स सॉफ्ट कॉर्नर देत असल्याचा आरोप केला गेला आहे. दरम्यान आता व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओनं सोशल मीडियावर एकच गोंधळ उडाला आहे. या व्हिडीओमध्ये मुंबई पोलीस सिद्धार्थ पकडून गाडीत बसवताना दिसत आहेत. खरं तर घरात विशाल आदित्य सिंह आणि मधुरिमा तुली यांच्या हाणामारी व्यतिरिक्त सिद्धार्थ शुक्ला एकटाच सर्वांशी मारमारी करताना दिसला होता. त्यानं सुरुवातीला आसिम रियाज आणि नंतर अरहान खानला धक्काबुक्की केली होती. नेहा धुपियाशी लग्नानंतर एक्स गर्लफ्रेंडविषयी काय विचार करतो अंगद बेदी बिग बॉसच्या घरात सिद्धार्थचा पारा एवढा चढत होता की होस्ट सलमान खानला स्वतःच त्याला राग कमी करण्याचा फॉर्म्यूला सांगावा लागला होता. त्यामुळे आता या व्हायरल व्हिडीओवरुन सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
या कारणासाठी सिद्धार्थ शुक्लाला झाली अटक सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला सिद्धार्थचा हा व्हिडीओ खूप जुना आहे. सूत्रांच्या माहितीनुसार हा व्हिडीओ सिद्धार्थच्याच अटकेचा आहे. स्पॉटबॉय-ईनं दिलेल्या वृत्तानुसार 22 जुलै 2018 मध्ये सिद्धार्थला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. त्याच्यावर वेगात कार चालवण्याचा आरोप होता. तो त्याची कार एवढ्या वेगानं चालवत होता की त्याचा गाडीवर ताबा सुटला आणि ती गाडी थांबेपर्यंत त्यानं 3 गाड्यांना धडक दिली होती. या घटनेत सिद्धार्थला दुखापत झाली नसली तरी इतर 3 लोकांना मात्र हॉस्पिटमध्ये भरती करावं लागलं होतं. PHOTOS : ‘पटाखा गर्ल’चा Traditional अंदाज, होणाऱ्या सासूबरोबर केली एंट्री! बिग बॉसच्या घरातून विशाल आदित्य सिंह बाहेर पडल्यानंतर माहिरा शर्मा सुद्धा मिड वीक शोमधून बाहेर पडली. त्यामुळे आता घरात फक्त शहनाझ गिल, आरती सिंह, रश्मि देसाई, सिद्धार्थ शुक्ला, आसिम रियाज आणि पारस छाब्रा असे 6 स्पर्धक उरले आहेत. ‘सेक्ससाठी केली जबरदस्ती..’ प्रसिद्ध कोरिओग्राफर विरुद्ध लैंगिक शोषणाचा गुन्हा

)







