Bigg Boss 13 : दरवाजा लॉक न करता आंघोळ करत होता सिद्धार्थ आणि...

Bigg Boss 13 : दरवाजा लॉक न करता आंघोळ करत होता सिद्धार्थ आणि...

अभिनेत्री कोएना मित्रा आणि रायटर सिद्धार्थ डे यांना मात्र बिग बॉसच्या घरात एका विचित्र घटनेचा सामना करावा लागला.

  • Share this:

मुंबई, 12 ऑक्टोबर : टीव्हीवरील सर्वाधिक वादग्रस्त शो बिग बॉसच्या 13 वा सीजन सुरू होऊन दोन आठवडे उलटले. पहिल्या आठवड्यातच या शोमधल्या स्पर्धकांमध्ये तू-तू मे मैं-मैं पाहायला मिळाली. सर्वच स्पर्धक एकमेकांशी स्पर्धा करताना दिसून येत आहेत. अशात या स्पर्धकांमधील असे काही क्षण जे सोशल मीडियावर प्रचंड ट्रेन्ड होताना दिसत आहेत. पण अभिनेत्री कोएना मित्रा आणि रायटर सिद्धार्थ डे यांना मात्र बिग बॉसच्या घरात एका विचित्र घटनेचा सामना करावा लागला. ज्याची चर्चा फक्त बिग बॉसच्या घरातच नाही तर सोशल मीडियावरही होताना दिसत आहे.

कलर्स टीव्हीचं अधिकृत अ‍ॅप Voot वर शेअर करण्यात आलेल्या एका व्हिडीओमध्ये कोएना आणि सिद्धार्थला उप्स.. मुमेंटचा सामना करावा लागत असल्याचं दिसत आहे. त्याचं असं झालं की, सिद्धार्थ डे बाथरुममध्ये आंघोळ करत होता मात्र त्यावेळी चुकीनं तो दरवाजा लॉक करण्याचं विसरुन गेला. त्याचवेळी कोएना मित्रा त्याच बाथरुममध्ये गेली ज्यात सिद्धार्थ अंघोळ करत होता आणि मग किंचाळत बाहेर आली.

ग्लोबलस्टार प्रियांकाला आजही आहे ही 'मिडल क्लास' सवय, वाचून तुम्हीही व्हाल हैराण

वॉशरुम एरियामध्ये त्यावेळी पारस छाब्रा आणि माहिरा शर्मा त्याठिकाणी उपस्थित होते. हे सर्व पाहिल्यावर त्या दोघांनाही आपलं हसू आवरता आलं नाही. बाहेर आल्यावर कोएनानं पारसला विचारते, या बाथरुमचा दरवाजा लॉक का केला नव्हता. त्यावर पारस म्हणतो तो निर्लज्ज मुलगा आहे.

पारस छाब्रा हा किस्सा घरातील इतर सर्वांना सांगतो. त्यावर सर्वजण हसू लागतात. सर्वजण सिद्धार्थ डेची खिल्ली उडवायला सुरुवात करतात आणि त्याला चिडवतात. हे पाहिल्यावर सिद्धार्थ काहीच बोलत नाही तो सरळ रुममध्ये निघून जातो. त्यानंतर सिद्धार्थ कोएनाला विचारतो की, तू हे कोणा-कोणाला सांगितलं आहे. त्यावर ही गोष्ट पारस आणि माहिराला ही गोष्ट माहित होती असं कोएना सांगते.

SHOCKING! 'मला साराचा बॉयफ्रेंड म्हणू नका' कार्तिक आर्यनची पॅपराजीला विनंती

सिद्धार्थला पाहिल्यावर शहनाझ गिल, सिद्धार्थ शुक्ला आणि असिम रियाज, 'कुंडी मत खडकाओ राजा सीधा अंदर आओ राजा' गाणं गायला सुरुवात करतात. पण सिद्धार्थ डे यावर काहीच उत्तर देत नाही. तो फक्त लाजताना दिसतो. आता यावर विकेंड का वारमध्ये सलमान खान यावर काय प्रतिक्रिया देतो आणि सिद्धार्थची कशी मजा घेतो याची सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. सलमान सिद्धार्थला अगोदरपासून ओळखतो. एवढं नाही तर त्या दोघांनी एकत्र काम केलं आहे.

अॅक्टिंगची हौस! मेंढपाळाने केलेला सलमान खानच्या गाण्याचा VIRAL VIDEO एकदा पाहाच!

================================================================

SPECIAL REPORT: ठाण्यातील 'हा' रस्ता ठरतोय मृत्यूचा सापळा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 12, 2019 02:34 PM IST

ताज्या बातम्या