मुंबई, 25 नोव्हेंबर : बिग बॉसच्या 13 व्या सीझनमध्ये वाइल्ड कार्डद्वारे घरात एंट्री करणारा स्पर्धक हिंदुस्तनी भाऊ अर्थात विकास फाटक सध्या सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरातील अंदाज प्रेक्षकांच्या पसंतीत उतरत असून अनेकदा सलमान खान सुद्धा त्याचं कौतुक करताना दिसतो. एकीकडे भाऊ घरात खूप थट्टा-मस्करी करताना दिसत असतानाच दुसरीकडे त्याच्या पत्नीला मात्र बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत आहे. रोजच्या समस्यांना कंटाळून तिनं अखेर पोलिसात धाव घेतली आहे आणि याचं कारण आहे हिंदुस्तानी भाऊचे खोटे नातेवाईक. मागच्या काही दिवसांपासून बिग बॉसच्या घरातील भाऊचं प्रदर्शन पाहता त्याच्या चाहत्यांमध्ये अधिकाधिक वाढ होताना दिसत आहे. अशात भाऊचे नातेवाईक म्हणून रोज नव्या लोकांची नावं समोर येत आहेत. या सर्वाला कंटाळून भाऊची पत्नी अश्विनी फाटकने खार पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. …आणि सिनेमाच्या सेटवरुन शाहरुख थेट पोहोचला तुरुंगात!
24 नोव्हेंबरला दिलेल्या तक्रारीत अश्विनीनं लिहिलं, ‘हिंदुस्तानी भाऊच्या विरोधात मागच्या काही दिवसांपासून बरेच खोटे व्हिडीओ, मेसेज आणि वक्तव्य समोर येत आहेत. हे सर्व करणारे लोक स्वतःला हिंदुस्तानी भाऊचे काका किंवा भाऊ असल्याचं सांगत आहेत. आमच्या कुटुंबात माझी सासू, मुलगा, माझे आई-वडील आणि हिंदुस्तानी भाऊचा भाचा एवढेच लोक आहेत. या पत्राद्वारे मी सांगू इच्छिते की, अशा व्हिडीओमधून जर कोणत्याही प्रकारचा चुकीचा व्यवहार किंवा मेसेज दिला गेल्यास त्याला आम्ही जबाबदार राहणार नाही.’ ‘या’ आहेत बाॅलिवूडच्या सर्वात FIT MOMS, नेहमी राहतात स्टाइलिश
आपल्या या पत्रातून अश्विनी यांनी विनंती केली आहे की, कोणीही या खोट्या व्यक्तींच्या मुलाखती घेऊ नये. कारण हे लोक वादाचं कारण होऊ शकतात. हिंदुस्तानी भाऊ म्हणजेच विकास फाटक हा त्याच्या युट्यूब व्हिडीओसाठी खूप प्रसिद्ध आहे. युट्यूबवर त्याचे बरेच चाहते आहेत. त्यामुळेच त्याला बिग बॉसच्या घरात वाइल्ड कार्ड एंट्री देण्यात आली. सध्या तो बिग बॉसमध्ये सर्वांच खूप मनोरंजन करताना दिसत आहे. राखी सावंत म्हणते, मी उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना आधीच सावध केलं होतं… =============================================================================