मुंबई, 05 जानेवारी : सलमान खान आणि शाहरुख खान आता एकमेकांचे चांगले मित्र आहेत हे तर सर्वांनाच माहित आहे. पण एक वेळ अशीही होती की या दोघांमध्ये काही काळासाठी मदभेद झाले होते आणि त्यांची मैत्री तुटली होती. त्यामुळे आजही हे दोघं एकमेकांबद्दल जेव्हा काहीही बोलतात तेव्हा लोकं कान टवकारून ऐकू लागतात. नुकतीच बिग बॉसमध्ये सलमाननं शाहरुखची पोलखोल केली असून त्याच्याबद्दल एक मोठा खुलासा सुद्धा केला आहे. बरीच वर्ष एकमेकांपासून दूर राहिलेल्या सलमान आणि शाहरुखला बिग बॉसनं एकत्र आणलेलं सर्वांनीच पाहिलं. त्यावेळी या करण-अर्जुनच्या जोडीनं एकत्र काम करण्यास तयारी दर्शवली होती. पण आता बिग बॉस 13 मध्ये सलमाननं शाहरुखविषयी धक्कादायक खुलासा केला आहे. डर सिनेमात शाहरुखचा एक प्रसिद्ध डायलॉग आहे, क, क, क, क… किरण. पण सलमान खानचा असा दावा आहे की ही त्याच्याच खऱ्या आयुष्यातली कहाणी आहे. अभिनेत्री काजल आणि अभिनेता अजय देवगण यांनी नुकतीच तानाजी सिनेमाच्या प्रमोशनसाठी बिग बॉसच्या मंचावर हजेरी लावली. यावेळी एका टास्कमध्ये सलमानची खरं सांगण्याची परिक्षा घेण्यात आली. ‘अजूनही आठवतं जेव्हा मी पहिल्यांदा…’ दीपिकाला असं झालं होतं रणबीरशी प्रेम
या टास्कमध्ये काजोलनं सलमानला विचारलं की तू कधी तू कोणत्या टीचरच्या प्रेमात पडला आहेस का? त्यावर सलमाननं तिला पूर्ण किस्सा सांगितला तो म्हणाला मी माझ्या इंग्लिश टीचरच्या प्रेमात पडलो होतो. तिचं नाव होतं किरण यावर काजोल विचारते तू सुद्धा तिला क, क, क, क… किरण अशी हाक मारायचास का? काजोलच्या या प्रश्नावर सलमान सांगतो याची उत्पत्तीच माझ्यापासून झाली होती. या 6 अभिनेत्रींचे इंटिमेट सीन लीक झाल्यानं सोशल मीडियावर उडाली होती खळबळ! सलमाननं सांगितलं, मी माझ्या टीचरशी नीट बोलू शकत नव्हते त्यामुळे क, क, क, क… किरण असं बोलत असे. ही गोष्ट मी शाहरुखला सांगितलं. त्यानं हे त्याच्या सिनेमात वापरलं आणि मला याचं क्रेडिट सुद्धा दिलं नाही. थोडक्यात काय तर त्यानं माझा डायलॉग चोरला. सलमानच्या या बोलण्यावर सर्वांनाच हसू फुटलं. आता सलमाननं तर चेंडू शाहरुखच्या कोर्टात टाकला आहे. त्यामुळे यावर शाहरुख काय बोलतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. करोडोंची मालकीण असलेली दीपिका फक्त सिनेमाच नाही तर या गोष्टींमधूनही कमावते पैसा