मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /कंगना रणौतनं आता घेतला सलमानशी ‘पंगा’, दबंग खान ओरडून म्हणाला...

कंगना रणौतनं आता घेतला सलमानशी ‘पंगा’, दबंग खान ओरडून म्हणाला...

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये सलमान आणि कंगणामध्ये तगडी टक्कर पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये सलमान आणि कंगणामध्ये तगडी टक्कर पाहायला मिळत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये सलमान आणि कंगणामध्ये तगडी टक्कर पाहायला मिळत आहे.

मुंबई, 05 जानेवारी: बिग बॉसच्या घरात ‘विकेंड का वार’ नेहमीच चर्चेचा विषय ठरतो. पण या आठवड्यात मात्र काहीसं वेगळं चित्र आहे. नेहमीच कोणत्या कोणत्या वादामुळे चर्चेत राहणारी कंगणा रणौतनं बिग बॉसच्या मंचावर हजेरी लावली पण यावेळी ती खुद्द सलमान खानशीच पंगा घेताना दिसली. इतकंच नाही तर सलमान आणि कंगणामध्ये तगडी टक्कर पाहायला मिळाली.

कंगना रणौतनं सलमानशी खराखुरा पंगा घेतलेला नाही तर ती या ठिकाणी तिचा आगामी सिनेमा पंगाच्या प्रमोशनसाठी आली होती. यावेळी या दोघांनी काही मजोशीर टास्क सुद्धा केले. यातील एक होता एंटरटेनमेंट पंगा. कंगाना सलमानला म्हणते, या घरातले सदस्य नेहमीच एकमेकांशी ओरडून बोलतात. मग आज मी तुझ्यासाठी सुद्धा तसाच एक टास्क आणला आहे. ज्यात आपण आपल्या सिनेमांचे काही डायलॉग असेच बोलायचे आहेत. कंगनाचं बोलणं पूर्ण होण्याआधीच सलमान त्याचा बॉडीगार्ड सिनेमातील'मुझ पर एक एहसान करना कि मुझ पर कोई एहसान नहीं करना हा डायलॉग ओरडून ओरडून बोलताना दिसतो. ज्यामुळे कंगना घाबरते.

सलमानच्या या अवतारावर कंगनासुद्धा त्याला तसंच उत्तर देते. ती म्हणते मेरा सेन्स ऑफ ह्यूमर बहुत अच्छा है ये आपको धीरे धीरे पता चलेगा हा डायलॉग बोलताना दिसते. नंतर सलमान सुद्धा 'एक बार जो मैंने कमिटमेंट कर दी उसके बाद मैं खुद की भी नहीं सुनता। अब मैं खुद की मिमिक्री कर रहा हूं।' असं बोलतो आणि मग दोघंही हसू लागतात.

याशिवाय या शोमध्ये शनिवारच्या एपिसोडमध्ये अभिनेत्री काजल आणि अभिनेता अजय देवगण यांनी नुकतीच तानाजी सिनेमाच्या प्रमोशनसाठी बिग बॉसच्या मंचावर हजेरी लावली. यावेळी एका टास्कमध्ये सलमानची खरं सांगण्याची परिक्षा घेण्यात आली.

या टास्कमध्ये काजोलनं सलमानला विचारलं की तू कधी तू कोणत्या टीचरच्या प्रेमात पडला आहेस का? त्यावर सलमाननं तिला पूर्ण किस्सा सांगितला तो म्हणाला मी माझ्या इंग्लिश टीचरच्या प्रेमात पडलो होतो. तिचं नाव होतं किरण यावर काजोल विचारते तू सुद्धा तिला क, क, क, क... किरण अशी हाक मारायचास का? काजोलच्या या प्रश्नावर सलमान सांगतो याची उत्पत्तीच माझ्यापासून झाली होती.

सलमाननं सांगितलं, मी माझ्या टीचरशी नीट बोलू शकत नव्हते त्यामुळे क, क, क, क... किरण असं बोलत असे. ही गोष्ट मी शाहरुखला सांगितलं. त्यानं हे त्याच्या सिनेमात वापरलं आणि मला याचं क्रेडिट सुद्धा दिलं नाही. थोडक्यात काय तर त्यानं माझा डायलॉग चोरला. सलमानच्या या बोलण्यावर सर्वांनाच हसू फुटलं. आता सलमाननं तर चेंडू शाहरुखच्या कोर्टात टाकला आहे. त्यामुळे यावर शाहरुख काय बोलतो याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

First published:
top videos

    Tags: Bollywood, Kangana ranaut, Salman khan