मुंबई, 15 फेब्रुवारी : बिग बॉस 13चा फिनाले एपिसोड आज प्रसारित होणार आहे. या सीझनच्या विजेत्या बद्दल प्रेक्षकांच्या मनात बरीच उत्सुकता आहे. या ट्रॉफीसाठी सिद्धार्थ शुक्ला आणि आसिम रियाज हे दोघेही प्रबळ दावेदार मानले जात आहेत. बिग बॉस नुकताच फायनलिस्ट स्पर्धकांचा त्याच्या आतापर्यंच्या प्रवासाचा व्हिडीओ दाखवला. पण आता फिनालेला काही तास उरले असतानाच काही पैशांसाठी असिम रियाजनं ही शो सोडल्याचं वृत्त व्हायरल होत आहे. ज्यामुळे त्याच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. बिग बॉसच्या फिनानेच्या आधी घरातील प्रत्येक सदस्याला एक ऑफर दिली जाते. ही ऑफर पैशाच्या बॅगची असते. फिनालेच्या आधीच्या घरातील सदस्यांना ही बॅग घेऊन घरातून बाहेर पडण्याची संधी दिली जाते. ज्यानंतर हा सदस्य फिनालेच्या रेसमधून बाहेर पडतो. अशात यंदाच्या या सीझनमध्ये ही संधी दिली जाणार की नाही? जर दिली ही बॅग कोण घेणार? असे अनेक प्रश्न अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहेत. याबाबतच हे धक्कादायक वृत्त सध्या सगळीकडे व्हायरल होताना दिसत आहे. व्हॅलेंटाइन डेला मलायका अरोरानं शेअर केला VIDEO, हे खास काम करण्याचा दिला सल्ला
मीडिया रिपोर्टनुसार आसिम रियाज ही बॅग घेऊन बाहेर पडणार आहे. फिनालेच्या काही तासांआधीच हे वृत्त समोर आल्यानं सोशल मीडियावरील असिमच्या चाहत्यांना धक्का बसला आहे. पण या दरम्यान आसिमच्या ऑफिशिअल ट्विटर अकाउंटवर शेअर केलेल्या एका पोस्टनं मात्र या वृत्तामागच सत्य स्पष्ट केलं आहे. VIDEO : ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने अमृता फडणवीसांनी गायलं इंग्रजी गाणं आसिमच्या ट्विटर हॅन्डवर ट्वीट करण्यात आलं की, ज्यात आसिम बाबत सोशल मीडियावर पसरवण्यात आलेलं हे वृत्त साफ खोटं असल्याचं सांगण्यात आलं आहे. या ट्वीटमध्ये लिहिलं आहे, ‘कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेऊ नका. आसिमनं पैशाची बॅग घेतलेली नाही. हे सर्व फक्त तुम्हाला निराश करण्यासाठी करण्यात आलं आहे. आसिमला या शोचा विजेता होण्यासाठी त्याला शेवटपर्यंत वोट करत राहा.’
Dont believe any rumours that Asim took the money bag. Its just a strategy to demoralize u. Keep voting for our champ and make him the winner! 💪💪#AsimRiazForTheWin
— Asim Riaz (@imrealasim) February 14, 2020
माहिरा शर्मा या शोमधून बाहेर पडल्यानंतर आता घरात फक्त शहनाझ गिल, सिद्धार्थ शुक्ला, पारस छाब्रा असिम रियाज, रश्मी देसाई आणि आरती सिंह एवढेच सदस्य उरले आहेत. फिनालेच्या आधी स्पर्धकांचे डान्स परफॉर्मन्स दाखवण्यात येणार आहेत. काल प्रसारित झालेल्या प्रोमोमध्ये याची एक झलक दाखवण्यात आली होती. ‘रणभूमीवर जिंकण्याआधी मनभूमीवर विजय मिळवा’, पाहा Vijeta Teaser