VIDEO : 'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्ताने अमृता फडणवीसांनी गायलं इंग्रजी गाणं, युझर्संनी केलं ट्रोल

VIDEO : 'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्ताने अमृता फडणवीसांनी गायलं इंग्रजी गाणं, युझर्संनी केलं ट्रोल

व्हेंलटाईन डेच्या निमित्ताने या इंग्रजी गाण्याचा व्हिडिओ खुद्ध अमृता फडणवीस यांनी हे आपल्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे

  • Share this:

मुंबई, 14 फेब्रुवारी : माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची पत्नी अमृता फडणवीस यांचं आणखी एक गाणं समोर आलं आहे. व्हेंलटाईन डेच्या निमित्ताने या इंग्रजी गाण्याचा व्हिडिओ  खुद्ध अमृता फडणवीस यांनी हे आपल्या अधिकृत ट्वीटर अकाऊंटवर पोस्ट केला आहे. परंतु, या गाण्यावरून अमृता फडणवीस यांना ट्रोलकऱ्यांचा सामना करावा लागला आहे.

अमृता फडणवीस यांनी व्हेंलटाईन डेच्या निमित्ताने हे गाण रेकॉर्ड केलं होतं. लोकप्रिय इंग्रजी गायक lionel richie याने हे गायलेलं आहे. हेच गाणं अमृता फडणवीस यांनी आपल्या आवाजात गाऊन व्हेंलटाईन डेसाठी रिलीज केलं आहे.

lionel richie याने 1983 मध्ये हे गाणं गायलं होतं. त्यानंतर अमृता फडणवीस यांनी हे आपलं आवडतं गाणं आहे, असं सांगून प्रसिद्ध केलं आहे. याआधीही अमृता यांनी अनेक गाणी गायली आहे. बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्यासोबतही त्यांचा एक अॅल्बम रेकॉर्ड करण्यात आला होता.

परंतु, अमृता यांचं हे गाण ट्वीटरकरांना काही आवडलं नाही. अनेक युझर्संनी अमृता यांच्या गाण्यावरून खिल्ली उडवली आहे. एका युझर्सने तर 'हे मला सैन नाई होत' असं सांगणारं 'नाळ' चित्रपटातील श्रीनिवासचा डायलॉगचा  स्क्रीन शॉट शेअर केला आहे.

================

तर एका युझर्सने तर अमृता यांचे गाणं हे राणू मंडला यांच्यापेक्षा चांगलं आहे, अशी खोचक प्रतिक्रिया दिली आहे.

=================

हे आहे lionel richie यांचं मुळ गाणं

First published: February 14, 2020, 8:30 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading