मुंबई, 14 फेब्रुवारी : अभिनेत्री मलायका अरोरा मागच्या काही काळापासून अर्जुन कपूरसोतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. आज व्हॅलेंटाइन डेच्या निमित्तानं सर्वच बॉलिवूड कलाकारांनी त्यांच्या पार्टनरसोबतचे फोटो शेअर करताना दिसत आहेत. यात मलायका अरोराही मागे नाही तिनं एक खास व्हिडीओ शेअर करत तिच्या चाहत्यांना व्हॅलेंटाइन डेला एक खास काम करण्याचा सल्ला दिला आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मलायकानं तिच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ती तिच्या घराच्या गार्डन एरियामध्ये उभी आहे. या व्हिडीओमध्ये मलायका तिच्या गार्डनमध्ये रोप लावताना दिसत आहे. यासोबतच मलायकानं तिच्या चाहत्यांनाही व्हॅलेटाइन डेला असंच करण्याचा सल्ला दिला आहे.
हा व्हिडीओ शेअर करताना मलायकानं लिहिलं, हे तुम्हाला व्हॅलेंटाइन डेच्या शुभेच्छा देण्यासाठी नाही आहे. आज मी काहीसं उलट करणार आहे. मी तुम्हाला सल्ला देईन की प्रत्येक प्रेमाची निवड करा. तुमच्यासाठी प्रेमाचा अर्थ काय आहे? घरी जेवण बनवणं, आपल्या जवळच्या व्यक्तींसोबत वेळ घालवणं, तुमचा व्हॅलेंटाइन डे या सर्वांच्या बाबतीतच आहे का? मलायकाचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर खूप व्हायरल होताना दिसत आहे.
मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांच्या नात्याची चर्चा बीटाऊनमध्ये जोरदार सुरू आहे. अर्जुन कपूरनं काही दिवसांपूर्वी एका मुलाखतीत त्याच्या लग्नाचा प्लान शेअर केला होता. यासोबतच त्याचं लग्न गुपचूप होणार नसल्याचंही त्यानं स्पष्ट केलं होतं. पण नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अर्जुननं, सध्या तरी माझा लग्नाचा कोणताही विचार नाही असं स्पष्ट केलं. तसेच जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा मी लग्न करेन असंही त्यानं सांगितलं.