जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Aryan Khan Case: NCB ने प्रसिद्ध चित्रपट निर्माता इम्तियाज खत्रीच्या घरावर मारला छापा; आढळले अमली पदार्थ

Aryan Khan Case: NCB ने प्रसिद्ध चित्रपट निर्माता इम्तियाज खत्रीच्या घरावर मारला छापा; आढळले अमली पदार्थ

Aryan Khan Case: NCB ने प्रसिद्ध चित्रपट निर्माता इम्तियाज खत्रीच्या घरावर मारला छापा; आढळले अमली पदार्थ

अभिनेता शाहरुख खानच्या मुलाला काही दिवसांपूर्वी ड्रग्स (Drugs Case) प्रकरणात अटक करण्यात आली होती. हे प्रकरण आणखी गंभीर बनत असल्याचं दिसत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 9ऑक्टोबर- अभिनेता शाहरुख खानच्या मुलाला काही दिवसांपूर्वी ड्रग्स (Drugs Case) प्रकरणात अटक करण्यात आली होती. हे प्रकरण आणखी गंभीर बनत असल्याचं दिसत आहे. आर्यनसोबत आणखी ७ जणांना क्रूझवरील (Cruise) रेव्ह पार्टीत अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता आणखी एका एका व्यक्तीच्या घरी छापा टाकत त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. हा व्यक्ती दुसरा कोणी नसून प्रोड्युसर इम्तियाज खत्री आहे.

News18

आर्यन खान ड्रग्स प्रकरणात आणखी एका व्यक्तीचं नाव समोर आलं आहे. NCBने मुंबईतील बांद्रा येथे छापा मारला आहे. दरम्यान इम्तियाज खत्री या प्रोड्युसरला ताब्यात घेतलं आहे. त्याच्याकडे काही प्रमाणात ड्रग्स आढळून आले आहेत. रात्रीपासून NCB ही कारवाई करत होती . क्रूझ पार्टीत इम्तियाज खत्रीने हे ड्रग्स पुरवल्याचं म्हटलं जात आहे. कारण तो अटक केलेल्या एका आरोपीच्या संपर्कात होता. त्याच्याशी व्हॉट्सऍप चॅट करत असल्याचंही आढळून आलं आहे. कौन आहे इम्तियाज खत्री- इम्तियाज खत्री हा पेश्याने एक बिल्डर आहे. INK इंफ्रास्ट्रक्चर नावाची त्याची एक कंपनी आहे. इतकंच नव्हे तर त्याची वीवीआईपी यूनिवर्सल एंटरनेटमेंट नावाचीसुद्धा कंपनी आहे. यामध्ये अनेक बॉलिवूड कलाकरांना संधी दिली जाते. तो बॉलिवूड चित्रपटांमध्ये पैशांची गुंतवणूक करतो. इतकंच नव्हे तर मुंबईमध्ये त्याची एक क्रिकेट टीमसुद्धा आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात