Home /News /mumbai /

आर्यन खाननं ड्रग्स घेतले होते का? , NCB च्या पंचनामामध्ये झाला खुलासा

आर्यन खाननं ड्रग्स घेतले होते का? , NCB च्या पंचनामामध्ये झाला खुलासा

आर्यन खान सध्या आर्थर रोड तुरुंगात आहे. मात्र आर्यन खाननं खरंच ड्रग्स घेतलं होते का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.

    मुंबई, 09 ऑक्टोबर: गेल्या काही दिवसांपासून NCB नं Cordelia क्रूझवर केलेल्या कारवाईची जोरदार चर्चा सुरु आहे. या कारवाईत बॉलिवूड अभिनेता शाहरुख खान (Shah rukh khan) याचा मुलगा आर्यन खान (Aryan Khan) यालाही अटक करण्यात आली आहे. आर्यन खानसह अन्य आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आर्यन खान सध्या आर्थर रोड तुरुंगात आहे. मात्र आर्यन खाननं खरंच ड्रग्स घेतलं होते का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. एनसीबीनं सांगितलं की, आर्यन खानने एनसीबी अधिकाऱ्यांसमोर कबूल केले आहे की तो चरसचं सेवन करतो. त्याचा मित्र अरबाज मर्चंट त्याच्या शूजमध्ये 6 ग्रॅम चरस लपवून लक्झरी क्रूझवर गेला होता. जेणेकरून त्यांना क्रूझवर धमाकेदार पार्टी करता येईल. हेही वाचा- Mumbai Drug Case: 'लाव रे तो व्हिडिओ' म्हणत नवाब मलिकांचा नवा गौप्यस्फोट 2 ऑक्टोबरच्या रात्री मुंबईच्या समुद्रात ज्या लक्झरी क्रूझवर NCB ने छापा टाकला होता. त्याच्याशी संबंधित महत्त्वाची माहिती समोर आली आहे. क्रूझमधील एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा अरबाजला विचारले की त्याच्याकडे काही ड्रग्ज आहेत का, तेव्हा त्याने सांगितले की त्याने त्याच्या शूजमध्ये ड्रग्स लपवले आहेत. NCBनं विचारलं असता अरबाज मर्चंटने स्वतः त्याच्या शूजमधून चरस असलेले ZIP LOCK पाउच बाहेर काढले. अरबाजने कबूल केलं की तो आर्यन खानसोबत चरस खातो आणि त्यांचा क्रूझवर धम्माल मस्ती करण्याचा प्लान होता. हेही वाचा- T20 World Cup: पाकिस्तान टीममध्ये 3 बदल, भारताची डोकेदुखी वाढणार?  जेव्हा एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी आर्यन खानला विचारले, तेव्हा त्याने कबूल केले की तो चरस खातो आणि हे चरस क्रूझ ट्रिपमध्ये स्मोकिंग करण्यासाठी घेऊन जात होतो. लक्झरी क्रूझ कॉर्डेलियावरील छाप्याचे हे तपशील एनसीबीच्या पंचनामावर आधारित आहेत. एनसीबीच्या पंचनाम्यातील धक्कादायक खुलासे NCB च्या पंचनाम्यात दोन पंचांचा उल्लेख आहे. किरण गोसावी आणि प्रभाकर रोघोजी सेन. या पंचनामाच्या पान क्रमांक 6 मध्ये आर्यन खान आणि अरबाज मर्चंटचा उल्लेख आहे. पंचनाम्या नुसार, आर्यन खान आणि अरबाज मर्चंटने पहिल्यांदा एनसीबी अधिकारी आशिष रंजन प्रसाद यांना विचारल्यावर त्यांची नावे दिली. मग एनसीबीच्या अधिकाऱ्यानेही त्याला चौकशीचे कारण देखील सांगितले. इम्तियाज खत्रीच्या घरावर छापा प्रोड्युसर इम्तियाज खत्री याच्या घरावर एनसीबीनं छापा टाकला आहे. NCBने मुंबईतील बांद्रा येथे छापा मारला आहे. दरम्यान इम्तियाज खत्री या प्रोड्युसरला ताब्यात घेतलं आहे. त्याच्याकडे काही प्रमाणात ड्रग्स आढळून आले आहेत. रात्रीपासून NCB ही कारवाई करत होती . क्रूझ पार्टीत इम्तियाज खत्रीने हे ड्रग्स पुरवल्याचं म्हटलं जात आहे. कारण तो अटक केलेल्या एका आरोपीच्या संपर्कात होता. त्याच्याशी व्हॉट्सऍप चॅट करत असल्याचंही आढळून आलं आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Aryan khan, NCB

    पुढील बातम्या