मुंबई, 12 जून : बॉलिवूड कलाकारांबाबत प्रत्येक लहान गोष्ट जाणून घेण्याची त्यांच्या चाहत्यांना नेहमीच उत्सुकता असते. अशातच अनेकदा बॉलिवूड कलाकारांचे काही जुने फोटो किंवा व्हिडिओ अचानक व्हायरल होतात आणि चर्चेचा विषय बनतात. आताही सोशल मीडियावर असाच एक फोटो व्हायरल होत आहे ज्यामध्ये अभिनेता हृतिक रोशनचा फोटो व्हायरल होत आहे. ज्यात त्याच्यासोबत बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अभिनेत्री सुद्धा दिसत आहे. पण हा फोटो पाहून तिला ओळखणं खूप कठीण आहे.
डॅशिंग पोलीस ऑफिसर बघायचाय? तर मग आयुष्यमानचा 'Article 15' पाहाच
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हृतिकचा हा फोटो खूप जुना आहे. हृतिकच्या बॉलिवूड करिअरच्या सुरुवातीच्या काळातील हा फोटो आहे आणि या फोटोत बॉलिवूडची चुलबूली गर्ल आलिया भट सुद्धा दिसत आहे. हा फोटो निर्माती अनु रंजन हिनं तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला. यामध्ये आलियासोबत तिची बहीण शाहीन तसेच अनु रंजनच्या दोन्ही मुली, अनुष्का आणि आकांक्षा सुद्धा दिसत आहेत. या दोघीही आलियाच्या बेस्ट फ्रेंड आहेत. अनुष्का रंजननं 2015मध्ये वेडिंग पुलाव या सिनेमातून बॉलिवूड पदार्पण केलं होतं.
आलियाच्या बालपणीचा हा फोटो सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. यातील आलियाचा क्यूट लुक कौतुकाचा विषय ठरत आहे. सध्या हृतिक त्याचा आगामी सिनेमा ‘सुपर 30’मुळे सगळीकडे चर्चेत आहे. या सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला आणि त्याला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसादही लाभला. यासिनेमात हृतिक मॅथमॅटिशियन आनंद कुमार यांची भूमिका साकारत आहे. तर दुसरीकडे आलिया भट लवकरच ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमामध्ये बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबत पहिल्यांदाच स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन अयान मुखर्जी करत आहे.
सोशल मीडिया पोस्टमुळे मलायका होतेय ट्रोल, 'त्या' फोटोमध्ये नक्की आहे तरी काय?