घरी असताना दीपिका अशी करते रणवीरची धुलाई, हा व्हिडिओ आहे पुरावा

रणवीरनं नुकताच त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 12, 2019 01:55 PM IST

घरी असताना दीपिका अशी करते रणवीरची धुलाई, हा व्हिडिओ आहे पुरावा

मुंबई, 12 जून : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह सध्या त्याचा आगामी सिनेमा ‘83’ च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या सिनेमाचं शूटिंग सध्या लंडनमध्ये सुरू असून रणवीर या सिनेमासाठी खूपच उत्साही आहे. रणवीरनं नुकताच त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहिल्यावर रणवीरच्या चाहत्यांना धक्का बसू शकतो. कारण या व्हिडिओमध्ये दीपिका बॅटने रणवीरची धुलाई करताना दिसत आहे.

सोशल मीडिया पोस्टमुळे मलायका होतेय ट्रोल, 'त्या' फोटोमध्ये नक्की आहे तरी काय?

रणवीरनं हा व्हिडिओ काही वेळा पूर्वीच त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओला रणवीरनं माझं जीवन रिल आणि रिअल असं कॅप्शन दिलं आहे. यामध्ये दीपिका रणवीरला बॅटनं मारत आहे आणि रणवीर जोरजोरात उड्या मारत ओरडत आहे. खरं तर हा एक मजेशीर व्हिडिओ असून नुकताच दीपिकानं ‘83’ च्या टीमला जॉइन केलं त्यावेळी शूट करण्यात आला आहे. या सिनेमामध्ये दीपिका कपिल देव यांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे. या सिनेमामध्ये रणवीर-दीपिका हे रिअल लाइफ कपल लग्नानंतर पहिल्यांदाच ऑनस्क्रिन कपल म्हणून दिसणार आहे.

जोरजोरात हसत होती प्रियांका चोप्रा आणि अचानक माकडानं लगावली कानशीलात


Loading... 

View this post on Instagram
 

Story of my Life 😅 Real & Reel ! @deepikapadukone @83thefilm 🏏🎥🎞


A post shared by Ranveer Singh (@ranveersingh) on

रणवीरनं शेअर केलेल्या या व्हिडिओचं चाहते खूप कौतुक करत असून अनेकांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. रणवीर आणि दीपिका यांनी शेवटचं पद्मावत सिनेमात एकत्र काम केलं होतं त्यानंतर ते ‘83’मध्ये एकत्र दिसणार आहेत. मागच्या बऱ्याच काळापासून कपिल देव यांची पत्नी रोमी भाटियाच्या भूमिकेसाठी दीपिकाच्या नावाची चर्चा होती मात्र तिनं या सिनेमात काम करणार की नाही हे स्पष्ट केलं नव्हतं मात्र तिनं आता या भूमिकेसाठी होकार दिला असून ती शूटिंगसाठी लंडनाही पोहोचली आहे.

हृतिक रोशनसोबत असलेल्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीला ओळखलं का?
'83' या बायोपिकचं दिग्दर्शन कबीर खान करत आहे. या सिनेमात रणवीर व्यतिरिक्त हार्डी संधू, साकिब सलीम, पंकज त्रिपाठी, चिराग पाटील, आदिनाथ कोठारे, ताहिर भासिन, एमी विर्क आणि साहिल खट्टर अशी तगडी स्टारकास्ट पाहायला मिळणार आहे. हा सिनेमा 10 एप्रिल 2020ला प्रदर्शित होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 12, 2019 01:53 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...