मुंबई, 12 जून : ‘हॉट’ आणि ‘बोल्ड’ हे शब्द आता मराठी सिने इंडस्ट्रीमध्ये नवखे राहिलेले नाहीत. मागील वर्षी आलेल्या ‘शिकारी’ सिनेमातून मराठी सिनेमामध्ये पहिल्यांदा एवढ्या मोठ्या प्रमाणावर बोल्ड दृश्य दाखवण्यात आली होती. पण आता त्याहून जास्त बोल्ड दृश्य दुहेरी अर्थांचे संवाद, तुफान कॉमेडी याचं मिश्रण असेला ‘टकाटक’ हा मराठी सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. पण नुकतच रिलीज झालेलं या सिनेमातील ‘ये चंद्राला’ हे गाणं सोशल मीडियावर खूप चर्चेत आहे. हे गाणं मराठीमधील आतापर्यंतचं सर्वात बोल्ड गाणं म्हटलं जात आहे.
WORLD CUP सुरू असतानाही टीम इंडियानं पाहिला 'भारत'
‘टकाटक’ या सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला बोल्ड दृश्यांचा मसाला आणि दुहेरी अर्थांच्या संवादांचा तडका असलेल्या या ट्रेलरला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला होता. टाइमपास फेम प्रथमेश परब या सिनेमामध्ये मुख्य भूमिकेत आहे. तर अभिनेत्री रितिका श्रोत्री या सिनेमात प्रथमेश सोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. याशिवाय अभिनेता अभिजीत आमकर आणि प्रणाली भालेराव या जोडी सुद्धा या सिनेमात झळकणार आहे. मिलिंद कावडे यांचं दिग्दर्शन असलेल्या ‘टकाटक’ सिनेमातील ‘ये चंद्राला’ हे गाण अभिजीत आणि प्रणाली यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे. या गाण्यातील बोल्ड दृश्यामुळे हे गाणं सर्वत्र चर्चेत आलं आहे.
सोशल मीडिया पोस्टमुळे मलायका होतेय ट्रोल, 'त्या' फोटोमध्ये नक्की आहे तरी काय?
View this post on Instagram
ये चंद्राला हे गाणं गीतकार जय अत्रे यांनी लिहिलं असून गायिका श्रुती राणे हिनं ते गायलं आहे. सिनेमाच्या ट्रेलर मधील बोल्डनेस या गाण्यातही आपल्याला पाहायला मिळतो. या सिनेमात भारत गणेशपुरे, प्रदीप पटवर्धन, आनंदा कारेकर, उमेश बोलके यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असून हा सिनेमा येत्या 28 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
हृतिक रोशनसोबत असलेल्या 'या' प्रसिद्ध अभिनेत्रीला ओळखलं का?