मुंबई, 29 डिसेंबर- बिग बॉस मराठीच्या तिसऱ्या (Bigg Boss Marathi 3) पर्वाचा विजेता सांगलीचा विशाल निकम ठरला**(bigg boss marathi 3 winner vishal nikam )** आहे. त्याला हा शो जिंकल्याबद्दल बिग बॉसची ट्रॉफी आणि 20 लाखाच्या रक्कमेचा चेक मिळाला आहे. या मिळालेल्या रक्कमेचे विशाल काय करणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे. याचा खुलासा नुकताच विशालने केला आहे. एका पोर्टलने यासंबंधी वृत्त दिलं आहे. विशाल निकमने म्हटलं आहे की, मी अजूनही संघर्ष करत आहे. माझ्याकडे मुंबईत स्वत:चे घर नाही. मी भाड्यानेच राहतो. बिग बॉसमध्ये येण्यापूर्वी सुद्धा मी PG म्हणून राहायचो. त्यात अजूनही ट्रेननेच प्रवास करतो. त्यामुळे मी हे पैसे माझ्या भविष्यासाठी वापरेन", असं विशाल म्हणाला. वाचा- ‘BBM3’चा विजेता होताच विशाल निकमला सांगलीकरांनी दिलं खास सरप्राइज तर विशाल पुढे म्हणतो की, मला माझ्या गावकऱ्यांसाठी, माझ्या लोकांसाठी काहीतरी करायचं आहे. त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलं. आणि, या प्रवासात मला साथ दिली. पण मला एका गोष्टीचा खूप आनंद आहे. की माझ्यासारख्या सामान्य माणसाने बिग बॉस मराठीसारखा मोठा शो जिंकला.
विशाल निकम मुळचा सांगली जिल्ह्यातील खानपूरचा आहे. बिग बॉस मराठी तीनचा किताब जिंकल्यानंतर विशाल निकमचे त्याच्या गावी जंगी स्वागत करण्यात आले. डोक्याला फेटा बांधून व बैलगाडीतून महाराष्ट्राच्या या रांगड्या गड्याची मिरवणूक काढण्यात आली. याचा व्हिडिओ देखील त्याने सोशल मीडियावर शेअर केला आहे. तसेच गावातील पोराला विजयी केल्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार असं म्हणत विशाले चाहत्यांन धन्यवाद म्हटलं होते. वाचा- सिद्धू यांच्या कुत्र्याच्या ग्रॅज्युएटचा किस्सा ऐकून म्हणाल हे तर काहीच नाय…. विशालच्या साध्या राहणीमानामुळे आणि सरळ मनामुळे या घरात तो प्रेक्षकांचे मन जिंकण्यास यशस्वी झाला. या घरात प्रत्यकवेळी तो त्यांच्या मित्रांसाठी उभा राहताना दिसला. विकास पाटील, सोनाली पाटील तसेच मीनल शाह यांच्यासोबत त्याची खास बॉन्डिंग झाली होती. शेवटपर्यंत ही मैत्री तशीच राहिली.