मराठी बातम्या /बातम्या /मनोरंजन /

Video : 'बिग बॉस मराठी 3' चा महाविजेता होताच विशाल निकमला सांगलीकरांनी दिलं एकदम कडक सरप्राइज !

Video : 'बिग बॉस मराठी 3' चा महाविजेता होताच विशाल निकमला सांगलीकरांनी दिलं एकदम कडक सरप्राइज !

बिग बॉस मराठी तीन (Bigg Boss Marathi 3) या पर्वाचा महाविजेता सांगलीचा विशाल निकम ठरला आहे. विशालने बिग बॉस मराठीचा किताब जिंकल्यानंतर सर्व प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

बिग बॉस मराठी तीन (Bigg Boss Marathi 3) या पर्वाचा महाविजेता सांगलीचा विशाल निकम ठरला आहे. विशालने बिग बॉस मराठीचा किताब जिंकल्यानंतर सर्व प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

बिग बॉस मराठी तीन (Bigg Boss Marathi 3) या पर्वाचा महाविजेता सांगलीचा विशाल निकम ठरला आहे. विशालने बिग बॉस मराठीचा किताब जिंकल्यानंतर सर्व प्रेक्षकांचे आभार मानले आहेत.

  • Published by:  News18 Trending Desk

मुंबई, 29 डिसेंबर- बिग बॉस मराठी तीन (Bigg Boss Marathi 3) या पर्वाचा महाविजेता सांगलीचा विशाल निकम ठरला आहे. विशालने बिग बॉस मराठीचा किताब जिंकल्यानंतर सर्व प्रेक्षकांचे आभार मानले आहेत. आता विशाल निकमचे(bigg boss marathi 3 winner vishal nikam ) त्याच्या गावी जंगी स्वागत झाले आहे. याचा व्हिडिओ त्याने सोशल मीडियावर शेअर केले आहे.

गावकऱ्यांने विशालचे जोरात स्वागत केले आहे. याचा व्हिडिओ शेअर करत विशाल निकमने म्हटले आहे की, दसरा दिवाळी सणाला बिग बॉस घरात होतो, गावी आल्यावर दिवाळीच साजरी झाली रावं! आनंदाची आतिशबाजी 💥⚡ / यावेळी बैलगाडीत उभा राहून विशाल आपल्यावर विशाल प्रेम करणाऱ्या गावकऱ्यांचे आणि चाहत्यांचे ट्रॉफी हातात घेऊन आभार मानात होता. यावेळी विशालच्या डोक्याला फेटा देखील होता.

विशाल निकम ट्रॉफी जिंकल्यानंतर म्हणाला होता की, तुमची साथ आणि माऊलींचा आशीर्वाद हे बघा काय झालंय..आज मी बिग बॉसची ट्रॉफी जिंकली आहे. महाराष्ट्राच्या सगळ्या प्रेक्षकांचे, माझ्या रसिक मायबापांचे खरच मनापासून आभार ! मी नेहमीप्रमाणे सांगतो की, आईशप्पथ तुम्ही होता म्हणून मी इथपर्यंत आलो. खूप खूप प्रेम...या गावतल्या पोराल तुमच्या प्रेमामुळे ही बिग बॉस मराठी सीजन तीन ट्रॉफी जगता आली.. आता ही सुरूवात झाली आहे शेवट पण लयभारी होणार आहे. त्यामुळे आता तुम्ही बघाच मी किती फुल एनर्जीने काम करतो. असंच तुमचे प्रेम राहुदे..धन्यवाद आणि लय लव्ह यू....असे म्हणत त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.

वाचा-Virat vs BCCI वादावर आता अभिनेता शाहिद कपूरनेही दिली प्रतिक्रीया, म्हणाला...

विशाल निकमचा मराठी मालिका ते बिग बॉसच्या घऱापर्यंतचा प्रवास

विशाल निकमचा जन्म सांगलीतल्या खानापूर येथे एका शेतकरी कुटुंबात 10 फेब्रुवारी 1994 साली झाला. सांगलीतील विटा येथून त्याने भौतिकशास्त्र या विषयातून पदवी घेतली आहे. त्याच्या अभिनय प्रवासाबद्दल सांगायचे तर त्याने मिथुन चित्रपटातून 2018 मधे चित्रपट सृष्टीत पहिले पाऊल टाकले. त्यानंतर त्याने स्टार प्रवाहवरील साता जन्माच्या गाठी या मालिकेत युवराज ही मध्यवर्ती भूमिका साकारली. ही त्याची पहिली मालिका होती. धुमस या मराठी चित्रपटातही तो झळकला आहे.

वाचा-'मन झालं बाजिंद'मध्ये नवा ट्वीस्ट, अखेर गुरुजींनी सांगितलेलं भाकीत खरं ठरलं!

तसेच विशाल निकमने स्टार प्रवाहवरील जय भवानी जय शिवाजी या ऐतीहासिक मालिकेत शिवा काशिद यांची भूमिका साकारली होती. यानंतर त्याने स्टार प्रवाहवरील दख्खनचा राजा जोतिबा या पौराणिक मालिकेतील जोतिबाची भूमिका साकारली. यानंतर तो खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या घरात पोहचला. या मालिकेने त्याला एक वेगळी ओळख दिली. या सगळ्या प्रवासात त्याला बिग बॉस मराठी तीसऱ्या पर्वात जाण्याची संधी मिळाली.

First published:

Tags: Bigg boss marathi, Marathi entertainment