नवी दिल्ली, 29 डिसेंबर: शाहिद कपूरचा आगामी सिनेमा ‘जर्सी’ (Shahid Kapoor Jersey) कधी प्रदर्शित होणार याची प्रेक्षकांना अतुरता लागली आहे. हा सिनेम 31 डिसेंबरला प्रदर्शित होणार होता. दरम्यान, एक वृत्तसंस्थेशी बोलताना क्रिकेट जगतात सुरु असलेल्या बीसीसीआय विरुद्ध विराट कोहली यांच्या वादावर (Virat vs BCCI ) आपले मत व्यक्त केले आहे. गेल्या काही दिवसांपासून क्रिकेटच्या वर्तुळात बीसीसीआय विरुद्ध विराट असा वाद रंगला आहे. त्यांच्या वादावर अनेक स्तरातून संमिश्र प्रतिक्रीया येत आहेत. दरम्यान, क्रिकेटवर आधारित जर्सी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या पार्श्वभूमिवर एका वृत्तसंस्थेने शाहिद कपूरशी संवाद साधला यावेळी त्याला टेस्ट आणि वनडे आणि टी20 क्रिकेटमधल्या कर्णधारपदाच्या वादाबद्दल मत विचारण्यात आले. त्यावेळी, ‘मला वाटते की हे बीसीसीआयने (BCCI) ठरवायचे आहे. पण होय, दोन्हीचे फायदे आणि तोटे आहेत. पण, मला वाटतं संघासाठी जे सर्वोत्तम आहे तेच काम करावं. संघाच्या योग्यतेवर ते अवलंबून असेल’, असे मला वाटत असल्याचे शाहिदने यावेळी म्हटले आहे. शाहिद नंतर मृणाल ठाकूरला तिचा आवडता क्रिकेटर कोण आहे? असा प्रश्न विचारण्यात आला. विराट कोहली, सचिन तेंडुलकर आणि लसिथ मलिंगा हे माझे आवडते क्रिकेटर असल्याचे तिने यावेळी सांगितले. इतकेच नाही तर तिने यामागची कारणेदेखील सांगितली. विराट कोहली, सचिन तेंडुलकर माझे आवडते आहेत आणि मला माझ्या लांब, कुरळे केसांमुळे मलिंगा आवडत असल्याचे मृणालने म्हटले आहे. काही आठवड्यांपूर्वी, विराट कोहलीच्या जागी रोहित शर्माला नवीन एकदिवसीय कर्णधार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. अनेक चाहत्यांची उलटसुलट मते असताना, बीसीसीआय आणि भारताचा कसोटी कर्णधार पदाबाबत स्पष्टतेवरून जोरदार टीका झाली. बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी सांगितले की त्यांनी विराटला टी20 कर्णधारपदावरून पायउतार न होण्याची विनंती केली होती, तर विराटने असे कोणी सांगितले नसल्याचे म्हटले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.