मुंबई, 28 डिसेंबर - झी मराठीवरील नुकतीच प्रेक्षकांच्या भेटीस आलेली मालिका 'मन झालं बाजिंद' (Man Zal Bajind) प्रेक्षकांची आवडती मालिका झाली आहे. या मालिकेवर आणि त्यातील व्यक्तिरेखांवर प्रेक्षक भरभरून प्रेम करत आहेत. कृष्णा (Krishna) आणि राया (Raya) हि जोडी देखील प्रेक्षकांची अगदी आवडती जोडी बनली आहे. मात्र मालिकेत आता एक नवा ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. गुरुजींनी सांगितलेलं भाकीत अखेर खरं ठरणार आहे. कारण राया आणि कृष्णा यांच्या फोटोला हार पाहून तर हेच स्पष्ट होत आहे.
झी मराठीने त्यांच्या अधिकृत इनस्टावर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये राया आणि कृष्णाच्या फोटोला फुलांचा हार दिसत आहे. हा फोटो शेअर करत म्हटलं आहे की, गुरुजींनी सांगितलेलं भाकीत अखेर खरं ठरणार आहे. कारण राया आणि कृष्णा...यावरून मालिकेत या दोघांचा मृत्यू होणार आहे का असा प्रश्न सर्वांना पडणार आहे. यावरून एकच दिसते की मालिकेत लवकरच मोठा ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. मात्र मालिकेतीच या नव्या ट्वीस्टची मात्र नेटकऱ्यांनी सोशल मीडिावर चांगलीच खिल्ली उडवली आहे.
View this post on Instagram
या फोटोवर कमेंट करत एका नेटकऱ्यांने म्हटले आहे की, मला वाटले खरच खपली कि काय.....photo तरी नीट लावा यार 😂😂😂 तर दुसऱ्याने म्हटले आहे की,च्यामायला....बरं झालं ...आता चालू द्या पुनर्जन्म😂 तर आणखी एकाने म्हटले आहे की, १३ वा कोणत्या दिवशी आहे मग😂😂🔥🔥 तर आणखी एकाने म्हटले आहे की, पुनर्जन्म होईल बहुतेक😂कारण अजून बोर नाही केले ना प्रेक्षकांना पुरते म्हणून परत जन्म घेऊन येतील😂😂 अशा अनेक भन्नाट कमेंट या फोटोवर आल्या आहेत.
वाचा-‘अनुराधा’ अडचणीत; महिला आयोगाने घेतला आक्षेप, मागितलं स्पष्टीकरण
राया आणि कृष्णा एकमेकांना आपनल्या आयुष्यभराच्या जोडीदाराच्या रूपात बघत नाही आहेत. पण रायाच्या पत्रिकेत दोष असल्यामुळे त्याची पहिली बायको ही अल्पायुषी असेल असं भाकीत गुरुजींनी केलं आहे. आता हा फोटो पाहून हे भाकित खऱे होणार की आणखी नवा ट्वीस्ट येणार हे येणारे भागातच समजणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Entertainment, Marathi entertainment, Zee Marathi, Zee marathi serial