मुंबई, 22 फेब्रुवारी: टीव्ही शो बिग बॉसचा 14 (Big Boss 14) वा सीझन नुकताच संपला. हा सीझन रुबिना दिलैकनं (Rubina Dilaik) जिंकला आहे. तर राहुल वैद्य (Rahul Vaidya) बिग बॉस 14 चा उपविजेता ठरला आहे. पण या शो मधून निरोप घेण्यापूर्वी सलमान खानने नव्या सीझनबद्दल खूप महत्त्वपूर्ण गोष्टी सांगितल्या आहेत.
बिग बॉस सीझन 15 ( Big Boss 15) आता लवकरच म्हणजेच सप्टेंबर- ऑक्टोबर मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बिग बॉसच्या मेकर्सनी आतापासूनच या आगामी सीझनची तयारी देखील सुरू केली आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता येणाऱ्या सीजन कोणीही बिग बॉसच्या घराचा सदस्य होऊ शकतो.
सलमान खानने याबाबत अधिक माहिती देताना सांगितलं की, ‘ 'काही महिन्यांनंतर व्हूट सिलेक्टवर ( voot) बिग बॉस 15 चे ऑडिशन सुरु होतील आणि यामध्ये प्रत्येकजण भाग घेऊ शकतो. तसेच सामान्य जनता स्पर्धकांना मतदान करू शकते. यासंबंधी अधिक माहिती येत्या काही दिवसांत कळवली जाईल.’ सलमानच्या बोलण्यावरून सीझन 15 मध्ये सुद्धा पुन्हा एकदा सर्वसामान्य दिसणार अशी चर्चा आता सुरू झाली आहे. याआधी 2016 साली सगळ्यात आधी बिग बॉस 10 (big boss 10) मध्ये कॉमनर्सने भाग घेतला होता. हंगामातील विजेता मनवीर गुर्जर हा प्रत्येकासाठी नवा चेहरा होता. सीझन 11 मध्ये सुद्धा मेकर्सनी कॉमनर्स आणि सेलिब्रेटींची एकत्रित निवड केली होती .
शनिवारच्या एपिसोड मध्ये भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया हे बिग बॉस वरती आले होते. तेव्हा त्यांनी पुढच्या सीजन मध्ये भाग घेणार असल्याचं सांगितलं आहे. पण ते स्पर्धक म्हणून भाग घेतील की पाहुणे म्हणून येतील याबाबत अजून काही निश्चित कळू शकलेलं नाही.
अवश्य वाचा - Big Boss 14 Finale: रुबीना दिलैक ठरली विजेता, जाणून घ्या तिच्याबद्दलची माहिती
यापूर्वीच्या एका एपिसोड मध्ये सलमान खानने सुद्धा त्याच्या चाहत्यांना सांगितले होते की त्याचं मानधन 15 टक्केनी वाढवलं तरच तो पुढच्या सीजन मध्ये होस्ट म्हणुन दिसून येईल. एका रिपोर्टनुसार सलमानने या सीजनसाठी एका आठवड्याचे ( शनिवार- रविवार) 24 कोटी रुपये घेतले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bigg boss, Reality show, Salman khan