मुंबई 22 फेब्रुवारी : टीव्ही शो बिग बॉसचा 14 (Big Boss 14) वा सीझन रुबीना दिलैकनं (Rubina Dilaik) जिंकला आहे. तर राहुल वैद्य बिग बॉस 14 चा उपविजेता ठरला आहे. राहुल वैद्य आणि रुबीना दिलैक यांच्यात शेवटपर्यंत काँटे की टक्कर होती. मात्र, शेवटी रुबीनानं बाजी मारत विजेतेपद (Winner Big Boss 14) मिळवलं आहे.
फायनलच्या (Big Boss 14 Finale) अंतिम पाच स्पर्धकांमध्ये राखी सावंत आणि अली गोनी बाहेर पडल्यानंतर निक्की तांबोळी(Nikki Tamboli) , राहुल वैद्य आणि रुबीना दिलैक यांच्या टक्कर पाहायला मिळाली. मात्र, निक्की बाहेर पडल्यानंतर रुबीनानं राहुलला मात देत विजेतेपद मिळवलं. रुबीकाला बिग बॉस 14 च्या ट्रॉफीसोबतच 36 लाख रुपये मिळाले आहेत.
बिग बॉसच्या या सीझनमध्ये अधिक लोक रुबीनाचंच नाव पुढे करत होते आणि शेवटी रुबीनाच विजेता ठरली. रुबीना शोच्या सुरूवातीपासून चाहत्यांची फेवरेट होती. ती बिग बॉसच्या घरात आपला पती अभिनव शुक्लासोबत आली होती. मात्र, फायनलच्या 2 आठवडे आधीच अभिनव घरातून बाहेर पडला.
Congratulations to @RubiDilaik! ✨🎉🎊 Audience ka dil jeet kar aakhirkaar karli hai inhone #BiggBoss14 ki trophy haasil! How happy are you #Rubiholics?@BeingSalmanKhan #BB14 #BB14GrandFinale #BiggBoss14Finale #GrandFinaleBB14 pic.twitter.com/IRO5vXordi
— Bigg Boss (@BiggBoss) February 21, 2021
34 वर्षांची रुबीवा दिलैक छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध नाव आहे. रुबीनानं अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. तिनं छोटी बहू या मालिकेच्या माध्यमातून अभिनयात पदार्पण केलं होतं. रुबीना 'शक्तिः अस्तित्व के अहसास की', 'बनू मैं तेरी दुल्हन', 'पवित्र रिश्ता', 'कसम से', 'पुनर्विवाह-एक नई उम्मीद', 'देवों के देव महादेव' यासारख्या अनेक मालिकांमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.
रुबीना अभिनयासोबतच मॉडलिंगसाठीही प्रसिद्ध आहे. तिनं मिस शिमला 2006 आणि मिस नॉर्थ इंडिया 2008 हे किताबही आपल्या नावी केले आहेत. अभिनेत्रीनं 2018 मध्ये अभिनव शुक्लासोबत विवाह केला. अभिनवही अभिनेता असून बिग बॉसमध्ये काही दिवस रुबीनासोबत होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bigg boss