मुंबई 13 ऑगस्ट: ‘तान्हाजी द अनसंग वॉरिअर’ (Tanhaji) सुपरहिट झाल्यानंतर आता अजय देवगण (Ajay Devgan) एक नवा चित्रपट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. अजयच्या या नव्या चित्रपटाचं नाव ‘भुज द प्राइड ऑफ इंडिया’ (Bhuj The Pride of India) असं आहे. 1971 भारतानं युद्धात पाकिस्तानवर कसा विजय मिळवला? याची कहाणी या चित्रपटात दाखवली जाणार आहे. हा चित्रपट आज 13 ऑगस्ट रोजी डिस्ने हॉटस्टारवर प्रदर्शित झाला आहे.
OMG! सारा अली खान चालवतेय AK47; Rock climbingचे फोटोही होतायत व्हायरल
कसा आणि कुठे पाहाल चित्रपट?
खरं तर ‘भुज द प्राइड ऑफ इंडिया’ हा चित्रपट 14 ऑगस्ट 2020 रोजी सिनेमागृहांतच प्रदर्शित होणार होता. परंतु कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे प्रदर्शन लांबणीवर गेलं. अन् आता चित्रपट OTT प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर ऑनलाईन प्रदर्शित होणार आहे. 13 ऑगस्टपासून तो ओटीटीवर पाहण्यासाठी उपलब्ध होईल. डिस्ने प्लस हॉटस्टारच्या सशुल्क सबस्क्रिप्शनसह ‘भुज द प्राईड ऑफ इंडिया’ हा चित्रपट एचडीमध्ये डाऊनलोड केला जाऊ शकतो.
'अनन्या'चं फर्स्ट मोशन पोस्टर रिलीज; हृता दिसणार दमदार भूमिकेत!
1971 सालच्या भारत-पाकिस्तान युद्धावर हा चित्रपट आधारीत आहे. एका सत्य कथेवर हा चित्रपट आधारीत आहे. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील माधापार गावातील 300 महिलांची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. भारताला युद्धात विजय मिळवून देण्यासाठी या महिलांनी दिलेले योगदान कथेतून मांडण्यात आले आहे. अजय देवगणने या चित्रपटात इंडियन एअर फोर्सच्या पायलटची भूमिका साकारली आहे. या चित्रपटामध्ये अजय स्क्वाड्रन लीडर विजय कार्णिक यांची भूमिका साकारली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajay devgan, Movie release, Movie review