मुंबई, 13 ऑगस्ट- ‘फुलपाखरू’(Phulpakharu) मालिकेतून तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेली अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे (Hruta Durgule) होय. हृता ‘अनन्या’ (Ananya) या चित्रपटातून पदार्पण करत आहे, हे आपणा सर्वांनाचं माहिती होतं. आत्ता हृताच्या या चित्रपटाचा दमदार फर्स्ट मोशन पोस्टर(Motion Poster) रिलीज झाला आहे. हृताने आपल्या इन्स्टाग्रामवर हा पोस्टर शेयर करत सर्वांना माहिती दिली आहे. यामध्ये हृता एका दमदार भूमिकेत असल्याचं स्पष्ट होतं आहे.
View this post on Instagram
रंगमंचावर अफाट यश मिळविल्यानंतर ‘अनन्या’ हे नाटक आत्ता चित्रपटाच्या स्वरुपात आपल्या भेटीला येत आहे. हा चित्रपट नायिका केंद्रित असल्याचं नावावरूनचं स्पष्ट झालं आहे. यामध्ये हृता एका दमदार भूमिकेत पाहायला मिळणार आहे. हृताने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्टर रिलीज करत कॅप्शनमध्ये लिहिलं आहे, ‘अडथळ्यांना मारून 'लाथ' जी संकटांवर करते 'मात' तीच खरी अनन्या!!!शक्य आहे. तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे! सादर आहे मराठी चित्रपट ‘अनन्या’ चे पहिले ऑफिशिअल मोशन पोस्टर’.
(हे वाचा: ट्विटरवर ट्रेंड होतंय #BoyCottRadhikaApte;‘त्या’ न्यूड सीनमुळे होतेय ट्रोल;)
हृताच्या या पोस्टवरून तिच्या भुमिकेबद्दल बराचसा अंदाज आलेलाचं आहे. लेखक-दिग्दर्शक रवी जाधव यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. रवी जाधवसारख्या प्रसिध्द दिग्दर्शकाची निर्मिती असलेल्या या चित्रपटासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत.
(हे वाचा: परमसुंदरी! स्टायलिश साडीमध्ये मृण्मयीने वेधलं सर्वांचं लक्ष, पाहा PHOTO)
तसेच अभिनेत्री हृता दुर्गुळेला आत्ता चित्रपटामध्ये अभिनय करताना बघण्यासाठी सर्वांचीच उत्सुकता वाढली आहे. हृताने अनेक टीव्ही मालिकांमध्ये तसेच रंगमंचावर काम केलं आहे. तिने आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने सर्वांनाचं वेड लावलं आहे. ‘फुलपाखरू’ या मालिकेने तर हृताला ‘वैदही’ म्हणून एक नवी ओळख दिली आहे. आजही चाहते तिला याचं नावाने ओळखतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Marathi entertainment