जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / पाहा अजय देवगणचा ढासू अंदाज; Bhuj: The Pride Of India ट्रेलर प्रदर्शित

पाहा अजय देवगणचा ढासू अंदाज; Bhuj: The Pride Of India ट्रेलर प्रदर्शित

पाहा अजय देवगणचा ढासू अंदाज; Bhuj: The Pride Of India ट्रेलर प्रदर्शित

या चित्रपटात अजय देवगणसोबतच संजय दत्त आणि सोनाक्षी सिन्हा प्रमुख भूमिका साकारणार आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई 12 जुलै**:** बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay devgn) ‘भूज द प्राइड ऑफ इंडिया’ (Bhuj The Pride Of India) हा नवा चित्रपट घेऊन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या बहुप्रतिक्षित चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. (Bhuj The Pride Of India Official Trailer release) करोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे हा चित्रपट सिनेमागृहांऐवजी डिझने हॉटस्टावर या डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात अजय देवगणसोबतच संजय दत्त आणि सोनाक्षी सिन्हा प्रमुख भूमिका साकारणार आहेत.

अभिनेता सुनील शेट्टीची इमारत BMC ने केली सील, कारण ऐकून परिसरात खळबळ 1971 सालच्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान घडलेल्या एका सत्य कथेवर हा चित्रपट आधारीत आहे. गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील माधापार गावातील 300 महिलांची कथा या चित्रपटात दाखवण्यात आली आहे. भारताला युद्धात विजय मिळवून देण्यासाठी या महिलांनी दिलेले योगदान कथेतून मांडण्यात आले आहे. सुलक्षणा पंडितांनी का घेतली बॉलिवूडमधून EXIT? संजीव कपूरच्या प्रेमात होत्या वेड्या अजय देवगणने या चित्रपटात इंडियन एअर फोर्सच्या पायलटची भूमिका साकारली आहे. या चित्रपटामध्ये अजय स्क्वाड्रन लीडर विजय कार्णिक यांची भूमिका साकारणार आहे. हा चित्रपट 15 ऑगस्ट 2020 रोजी प्रदर्शित होणार होता. पण देशभरात सिनेमागृह बंद असल्यामुळे आता डिजिटल प्लॅटफॉर्मवर चित्रपट रिलीज करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशा शौर्यावर आणखी चित्रपट बनवले जाणे आवश्यक आहे असे अजय देवगणे व्हर्च्युल पत्रकार परिषदेत सांगितले होते.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात