• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • अभिनेता सुनील शेट्टीची इमारत BMC ने केली सील, कारण ऐकून परिसरात खळबळ

अभिनेता सुनील शेट्टीची इमारत BMC ने केली सील, कारण ऐकून परिसरात खळबळ

कोरोना विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. या वाढत्या संक्रमणाचा फटका आता प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी याला देखील बसला आहे.

 • Share this:
  मुंबई 12 जुलै: कोरोना विषाणूचं (Coronavirus) संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. या वाढत्या संक्रमणाचा फटका आता प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सुनील शेट्टी (Sunil Shetty) याला देखील बसला आहे. कोरोनामुळे त्याची राहती इमारत मुंबई महानगरपालिकेनं (BMC) सील केली आहे. मिळालेल्या माहितानुसार सुनील शेट्टीच्या ईमारतीत कोरोनाचे पाच रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे दक्षिण मुंबईतील अल्मोउन्ट रोड येथील पृथ्वी अपार्टमेंट सील करण्यात आलं आहे. (Suniel Shetty building sealed by BMC) या ठिकाणी राहणाऱ्या सर्व रहिवास्यांची आता कोरोना टेस्ट करण्यात आली. तोपर्यंत सर्व जण सेल्फ क्वारंटिनमध्येच राहणार आहेत. सुलक्षणा पंडितांनी का घेतली बॉलिवूडमधून EXIT? संजीव कपूरच्या प्रेमात होत्या वेड्या राज्यात 8 हजार 296 नवीन रुग्ण राज्यात दिवसभरात 8 हजार 296 नव्या करोनाबाधितांची नोंद झाली तर 179 जणांचा मृत्यू झाला. त्याच वेळी सहा हजार रुग्ण करोनामुक्त झाले. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या सध्या  एक लाख 14 हजार आहे. गेल्या 24 तासांत कोल्हापूर जिल्हा 1493, सांगली 1033, रायगड 409, सातारा 839, पुणे ग्रामीण 557 रुग्ण नव्याने आढळले. मुंबईत 504 नवीन रुग्णांची नोंद झाली, तर 13 रुग्णांचा मृत्यू झाला. 736 रुग्ण करोनामुक्त झाले.  उपचाराधीन रुग्णांची संख्या साडेसात हजारांच्या खाली गेली आहे.
  Published by:Mandar Gurav
  First published: