मुंबई 12 जुलै: ‘चलते चलते’ या चित्रपटातून नावारुपास आलेल्या सुलक्षणा पंडित (Sulakshana Pandit) 70 च्या दशकात बॉलिवूडमधील आघाडिच्या अभिनेत्री म्हणून ओळखल्या जायच्या. सुंदर देहयष्टी आणि जबरदस्त अभिनयाच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांच्या मनात एक वेगळंच स्थान प्रस्थापित केलं होतं. लोभस चेहऱ्याच्या सुलक्षणा यांची स्थिती आज अशी झाली आहे की कोणीही त्यांना ओळखणारही नाही. प्रसिद्ध गायक पंडीत जसराज यांच्या कुटुंबातील सुलक्षणा आज अज्ञातवासात आयुष्य जगत आहेत. संजीव कुमार (Sanjeev Kumar) यांनी त्यांचे प्रेम नाकारल्याने त्यांची अशी स्थिती झाली. आज सुलक्षणा यांचा 67 वा वाढदिवस आहे. (Sulakshana Pandit Birthday) त्यानिमित्तानं जाणून घेऊया त्या सध्या काय करतायेत?
Pran Death Anniversary: बॉलिवूडच्या ‘प्राण’ला मिळायचं नायकांपेक्षा जास्त मानधन
सुलक्षणा यांचा जन्म छत्तीसगढमधील एका उच्चभ्रू कुटुंबात झाला होता. त्यांचे वडील पंडीत जसराज एक नामांकित शास्त्रीय गायक होते. सुलक्षणा यांचा कल गाण्यापेक्षा अधिक चित्रपटांकडे होता. त्यामुळे त्यांनी लहानपणापासूनच प्रायोगिक रंगभूमीवर काम करण्यास सुरुवात केली. त्याकाळात स्त्रिया फारशा नाटकांमध्ये वगैरे काम करत नसत. परंतु वडिलांनी मात्र त्यांना पाठिंबा दिला. परिणामी कुटुंबीयांच्या प्रोत्साहनामुळेच 1975 साली उलझन या चित्रपटाद्वारे त्यांनी बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. लक्षवेधी बाब म्हणजे त्यांना संगीतापेक्षा अभिनय जास्त आवडत असला तरी चित्रपटांमध्ये गाण्यांच्या ऑफर त्यांना मिळत होत्या. अर्थात वडिलांकडून त्यांनी संगीताची देखील तालिम घेतली होती. परिणामी सुरुवातीच्या काळात मिळेल ते काम त्यांनी केलं. कसही करून बॉलिवूडमध्ये टिकून राहायचं हेच त्यांचं ध्येय होतं. संकल्प, संकोच, अपनापन, खानदान यांसारख्या काही चित्रपटांमध्ये त्यांनी महत्वाच्या भूमिका साकारल्या.
भाषा तज्ज्ञ कशी झाली अभिनेत्री? पाहा अवलिनचा Germany to India प्रवास
1975 च्या आसपास त्या यशाच्या शिखरावर होत्या. अभिनेत्री आणि गायिका या दोन्ही भूमिका त्या उत्तमपणे साकारत होत्या. याच काळात त्या अभिनेते संजीव कपूर यांच्या प्रेमात पडल्या. मात्र त्यांचं प्रेम हेमा मालिनी यांच्यावर जडलं होतं. परिणामी सुलक्षणा यांचा प्रस्ताव त्यांनी नाकारला. मात्र हा नकार त्या पचवू शकल्या नाही. त्या डिप्रेशनमध्ये गेल्या. याच काळात त्यांच्या मोठ्या भावाची हत्या झाली. आणि बहिणीच्या पतीचा मृत्यू झाला. त्या आधीच नैराश्येत होत्या अन् कुटुंबातही निराशेचं वातावरण होतं. या प्रतिकूल परिस्थितीमुळे त्या हळूहळू बॉलिवूडपासून दूर गेल्या. पुढे बराच काळ त्यांच्यावर मानसिक उपचार देखील सुरु होते. सध्या त्या आपल्या छत्तीसगढमधील गावात अज्ञातवासात आयुष्य जगत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actress, Entertainment, Love story