मुंबई, 03 एप्रिल: प्रसिद्ध कॉमेडियन आणि टेलिव्हिजनची लोकप्रिय होस्ट भारती सिंहच्या (Bharti Singh blessed with baby boy) घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. भारतीचा पती हर्ष लिंबाचिया (Bharti Singh and Haarsh Limbachiya welcomed their first baby) याने रविवारी (03 एप्रिल) फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली होती. या आनंदाची बातम्यानंतर कपलच्या फॅन्सचा आनंदही गगनात मावेनासा झाला आहे. अनेक सेलिब्रिटींनी, चाहत्यांनी भारती-हर्षला शुभेच्छा दिल्या आहेत. दरम्यान या आनंदाच्या क्षणांनंतर भारतीवर आणखी एका कारणामुळे कौतुकाचा वर्षाव होतो आहे. कॉमेडियन भारती सिंहचा एक खास व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. डिलिव्हरीच्या एक दिवस आधी देखील काम करत होती ही ‘सुपरमॉम’ भारती सिंह हिने रविवारी एका गोंडस बाळाला जन्म दिला. तर हा व्हायरल झालेला भारतीचा व्हिडीओ शनिवारचा (2 एप्रिल) चा आहे. हा व्हिडीओ तिच्या शोच्या सेटवरील आहे. याचा अर्थ ती डिलिव्हरीच्या एक दिवस आधी देखील काम करत होती. यामध्ये ती तिचा पती हर्ष याला मिठी मारुन विचारत आहे, ‘बाळ कधी जन्माला येईल?’ हे वाचा- अंकिता लोखंडे म्हणाली मी प्रेग्नंट आहे…. कंगनाच्या Lock Upp मध्ये काय केला खुलासा? भारतीचा विनोदी अंदाज या व्हिडीओमध्ये देखील पाहायला मिळतो आहे. हा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर Viral Bhayani ने शेअर कला असून त्याने कॅप्शनमधून भारतीला Salute, असं म्हटलं आहे.
भारतीचा हा व्हिडीओ पाहून अनेकजण तिचं कौतुक करत आहेत. भारती खूप स्ट्राँग आहे, असं एका युजरने लिहिलं आहे. तर एकाने लिहिलं आहे की, ती खरी रॉकस्टार आहे. तर अनेक युजर्सनी अशा आशयाची कमेंट केली आहे की, अनेक स्त्रिया अशा आहेत की ज्या त्यांच्या डिलिव्हरीपर्यंत काम करत असतात, त्या सर्वांना सलाम!. हर्ष लिंबाचिया याने रविवारी भारती सिंहसह प्रेग्नेन्सी शूट दरम्यानचा एक फोटो शेअर करत ही खूशखबर दिली होती. ‘Its a Boy’ अशी कॅप्शन देत हर्षने हा फोटो शेअर केला होता. भारतीने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे.