जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Bharti Singh and Haarsh Limbachiya Baby: कॉमेडियन Bharti Singh च्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन, पती हर्ष लिंबाचियाने शेअर केला Photo

Bharti Singh and Haarsh Limbachiya Baby: कॉमेडियन Bharti Singh च्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन, पती हर्ष लिंबाचियाने शेअर केला Photo

Bharti Singh and Haarsh Limbachiya Baby: कॉमेडियन Bharti Singh च्या घरी नव्या पाहुण्याचं आगमन, पती हर्ष लिंबाचियाने शेअर केला Photo

प्रसिद्ध कॉमेडियन आणि टेलिव्हिजनची लोकप्रिय होस्ट भारती सिंहच्या (Bharti Singh blessed with baby boy) घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. भारतीचा पती हर्ष लिंबाचिया (Bharti Singh and Harsh Limbachiya welcomed their first baby) याने फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई, 03 एप्रिल: प्रसिद्ध कॉमेडियन आणि टेलिव्हिजनची लोकप्रिय होस्ट भारती सिंहच्या (Bharti Singh blessed with baby boy) घरी नव्या पाहुण्याचं आगमन झालं आहे. भारतीचा पती हर्ष लिंबाचिया (Bharti Singh and Haarsh Limbachiya welcomed their first baby) याने फोटो शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. हर्षने भारती सिंहसह प्रेग्नेन्सी शूट दरम्यानचा एक फोटो शेअर करत ही खूशखबर दिली आहे. ‘Its a Boy’ अशी कॅप्शन देत हर्षने हा फोटो शेअर केला आहे. भारतीने एका गोंडस मुलाला जन्म दिला आहे. भारती सिंह तिच्या प्रेग्नेन्सीच्या काळातही टेलिव्हिजनवर काम करत होती. हर्षने हा फोटो शेअर करताच या कपलवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. अनेक चाहत्यांनी, सेलेब्सनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. काही मिनिटांपूर्वीच हर्षने ही गोड बातमी दिली आहे. तेव्हापासून अनेकांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे. अनेकांनी कमेंट केली आहे की, आम्ही छोट्या बाळाला बघण्यासाठी खूप उत्सुक आहोत.

जाहिरात

भारती सिंह गेल्या काही दिवसांपासून तिच्या प्रेग्नन्सीमुळे चर्चेत होती. ती या काळातही टीव्ही शो होस्ट करताना दिसली. त्यामुळे अनेक महिलांसाठी भारतीने आदर्श समोर ठेवला आहे. हर्ष लिंबाचिया आणि भारती सिंह (Bharati Singh and Haarsh Limbachiya Baby) या कपलचे या दरम्यानचे अनेक व्हिडीओ समोर आले आहेत. भारती सिंहही तिच्या प्रेग्नन्सीबाबत मोकळेपणाने अनेकदा बोलताना दिसली. हे वाचा- अंकिता लोखंडे म्हणाली मी प्रेग्नंट आहे…. कंगनाच्या Lock Upp मध्ये काय केला खुलासा? भारती सिंहने अशी प्रतिक्रिया दिली होती की, 2.5 महिन्यांपर्यंत तिला समजलेच नाही की ती गरोदर आहे. भारतीच्या मते तिच्या वजनामुळे तिला ही बाब कळली नाही. पिंकविलाला दिलेल्या एका मुलाखतीत भारतीने याबाबत माहिती दिली. ती म्हणते की, ‘अडीच महिन्यांपर्यंत मला याबाबत माहितच नव्हते. जाड लोकांना पटकन समजत नाही नाही. मी खात होते, शूट करत होते, इकडे-तिकडे फिरत होते, डान्स दीवानेच्या सेटवर डान्स करत होते.’ हे कपल सध्या रिअॅलिटी शो हुनरबाजसाठी सध्या शूट करत होते. याठिकाणी हर्ष भारतीची विशेष काळजी घेताना दिसत होता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: pregnancy
  • First Published :
जाहिरात
जाहिरात