जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / अरे देवा! फेसबुकवर बिकीनी फोटो टाकले म्हणून या डॉक्टरचं लायसन्स झालं रद्द

अरे देवा! फेसबुकवर बिकीनी फोटो टाकले म्हणून या डॉक्टरचं लायसन्स झालं रद्द

अरे देवा! फेसबुकवर बिकीनी फोटो टाकले म्हणून या डॉक्टरचं लायसन्स झालं रद्द

ही डॉक्टर सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. दररोज ती स्वतःचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच तिने स्वतःचे फोटो शेअर केले.

  • -MIN READ
  • Last Updated :

    नवी दिल्ली, 17 जून- म्यानमारमध्ये लॉन्जरी फोटो पोस्ट करण्याच्या नादात मॉडेल आणि डॉक्टर Nang Mwe San चं लायसन्स रद्द करण्यात आलं. याचा विरोध करत Nang ने ही घटना व्यक्ती स्वातंत्र्यांवर गदा आणणारी असल्याचं म्हटलं. Nang सोशल मीडियावर फार सक्रिय आहे. दररोज ती स्वतःचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असते. नुकतेच तिने स्वतःचे फोटो शेअर केले. या फोटोंमध्ये Nang बिकीनीमध्ये दिसत आहे. यात तिने अमेरिकेची प्रसिद्ध मॉडेल केंडल जेनरची नक्कल केली आहे. डॉक्टरचा हा लुक म्यानमार मेडिकल काउंसिलला आपत्तीजनक वाटला. यानंतर ३ जूनला त्यांनी Nang च्या नावाचं पत्रक काढत तिचं लायसन्स रद्द केलं. या पत्रकात म्हटलं की, Nang ने घातलेले कपडे हे म्यानमार संस्कृती आणि परंपरेच्या विरुद्ध आहेत. हेही वाचा-  ‘हिंदुस्तान जिंदाबाद था, जिंदाबाद है और जिंदाबाद रहेगा’ याआधीही Nang ला जानेवारीमध्ये एक पत्रक पाठवून ताकीद देण्यात आली होती. यात तिला फेसबुकवरून तिचे फोटो काढून टाकण्यास सांगण्यात आले होते. Nang नेही त्या पत्रकावर स्वाक्षरी केली होती. मात्र स्वाक्षरी करूनही तिने याचं पालन केलं नाही. २९ वर्षाच्या Nang ने २०१७ मध्ये मॉडेलिंगमध्ये आपलं करिअर सुरू करण्यापूर्वी डॉक्टर म्हणून पाच वर्ष प्रॅक्टीस केली आहे. हेही वाचा-  पाकविरुद्ध वक्तव्य करून चर्चेत राहिले हे 5 सेलिब्रिटी याबद्दल सांगताना Nang म्हणाली की, ‘मेडिकल एथिक्समध्ये ड्रेस कोडवर कोणतेही निरबंध नाहीत. रुग्णांवर उपचार करताना मी अशा पद्धतीचे कपडे घालत नाही. त्यामुळे मेडिकल काउंसिलचं हे म्हणणं मला अमान्य आहे.’ आता Nang मेडिकल काइंसिल विरोधात न्यायालयात जाण्याच्या विचारात आहे. ‘मला वाटतं की त्यांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणू नये. वैयक्तिक आयुष्यात मी कशी आहे याच्याशी त्यांचं काही देणं- घेणं नाही,’ असंही Nang म्हणाली. रोहित शर्मा ठरला भारताच्या विजयाचा शिल्पकार, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात