भारताने पाकिस्तानला हरवलं, खूश होतं सलमान खानने केलं हे ट्वीट

भारताने पाकिस्तानला हरवलं, खूश होतं सलमान खानने केलं हे ट्वीट

संपूर्ण देशाने टीम इंडियाचा विजय जल्लोषात साजरा केला. सोशल मीडियावर तर एकाहून एक मीम्स व्हायरल होत आहेत.

  • Share this:

मुंबई, 17 जून- भारताने १६ जूनला झालेल्या सामन्यात पाकिस्तानला ८९ धावांनी हरवत आयसीसी क्रिकेट विश्वचषकात अजून एक विजय स्वतःच्या नावावर नोंदवला. टीम इंडियाने पाकिस्तानला विश्वचषकामध्ये सलग सातव्यांदा हरवले आहे. पावसामुळे भारत- पाकिस्तानचा सामना पावसामुळे थांबवण्यात आला होता. दरम्यान, पाऊन न थांबल्यामुळे डकवर्थ लुईस नियमानुसार भारताने पाकिस्तानला ८९ धावांनी पराभूत केल्याचे सांगण्यात आले. रोहित शर्माच्या तुफान शतकी खेळीमुळे आणि कर्णधार विराट कोहलीच्या अर्धशतकामुळे भारताने पाच गडी गमावत ३३६ धावांचा डोंगर उभा केला.

हेही वाचा- अरे देवा! फेसबुकवर बिकीनी फोटो टाकले म्हणून या डॉक्टरचं लायसन्स झालं रद्द

पाकिस्तानसाठी ही धावसंख्या गाठण हे फार कठीण काम होतं. त्यात पावसामुळे ही धावसंख्या गाठणं पाकिस्तानला जवळपास अशक्यच झालं. संपूर्ण देशाने टीम इंडियाचा विजय जल्लोषात साजरा केला. सोशल मीडियावर तर एकाहून एक मीम्स व्हायरल होत आहेत. राजकीय नेत्यांपासून ते बॉलिवूड कलाकारांपर्यंत आणि खेळाडूंपासून ते सर्वसामान्य नागरिकापर्यंत सगळेच टीम इंडियाला शुभेच्छा देत होते. यात बॉलिवूडचा दबंग खान तरी कसा मागे राहिलं. सलमान खानने टीम इंडियाच्या विजयावर 'भारत' स्टाइल शुभेच्छा दिल्या. सलमानने ट्विटरवर टीम इंडियाची जर्सी घातलेला फोटो शेअर केला.

हेही वाचा- प्रकाश राजसोबत सेल्फी काढला म्हणून महिलेच्या पतीने केला अपमान

या फोटोला कॅप्शन देताना सलमानने लिहिले की, 'भारताच्या टीमला 'भारत'कडून हार्दिक शुभेच्छा.' सलमानसोबतच आशा भोसले यांनी शुभेच्छा देत म्हटलं की, 'टीम इंडियाने आतापर्यंत जेवढे सामने खेळले त्यात सगळ्याच देशांचा दारूण पराभव केला. माझा आवडता रंग निळा आहे.' तर तमन्ना भाटियाने लिहिले की, 'इंडिया.. इंडिया.. वा काय जिंकलो!' मिका सिंगने लिहिले की, 'इंडिया.. इंडिया... आपल्या क्रिकेट टीमला मनापासून शुभेच्छा. भारतीय असल्याचा मला अभिमान आहे.' तर अनिल कपूर यांनी ट्वीट करत म्हटलं की, 'आज सगळ्यांच्या नजरा टीव्हीलाच खिळल्या आहेत. एक अप्रतिम सामना आणि सुरेख विजय. रविवार चांगला गेला. शुभेच्छा.'

रोहित शर्मा ठरला भारताच्या विजयाचा शिल्पकार, इतर महत्त्वाच्या 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 17, 2019 11:35 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading