आदित्य पांचोलीची पत्नी म्हणाली, ‘माझ्या नवऱ्याला डेट करायची कंगना, तिला मुलगी कशी मानू?’

आदित्य पांचोलीची पत्नी म्हणाली, ‘माझ्या नवऱ्याला डेट करायची कंगना, तिला मुलगी कशी मानू?’

तुमचं एखाद्यासोबत नातं संपुष्टात आलं आहे आणि ती व्यक्ती आयुष्यात पुढे निघून गेली आहे तर तुम्ही त्यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करणार का?

  • Share this:

मुंबई, 14 जून - आदित्य पांचोलीची पत्नी जरीना वहाब यांनी पुन्हा एकदा आपल्या नवऱ्याची बाजू घेत कंगनाविरुद्ध हल्लाबोल केला. जरीना यांनी कंगनाने आदित्यवर लावलेल्या आरोपांमध्ये काही तथ्य नसल्याचं सांगितलं. जरीना म्हणाल्या की, ‘मी त्याला सर्वांपेक्षा जास्त ओळखते. त्याने माझ्यापासून काहीच लपवलं नाही. जर तुम्ही एखाद्या व्यक्तीसोबत नात्यात असता तेव्हा तुम्ही त्याच्यावर बलात्काराचे आरोप कसे करू शकता?’

डेक्कन क्रॉनिकलने दिलेल्या मुलाखतीत जरीना यांनी आदित्यवर लावलेल्या आरोपांबद्दल आपले मत स्पष्ट केलं. ‘तुमचं एखाद्यासोबत नातं संपुष्टात आलं आहे आणि ती व्यक्ती आयुष्यात पुढे निघून गेली आहे तर तुम्ही त्यांच्यावर लैंगिक शोषणाचा आरोप करणार का?’ यासोबतच जरीना म्हणाल्या की, ‘मी त्याला चांगलं ओळखते. मला माहिती आहे काय झालं होतं.. पण आदित्यने काही चुकीचं केलेलं नाही.’

हेही वाचा- अर्जुन कपूरपासून सलमान खानपर्यंत, या 5 स्टार्सची बॉडी आहे जबरदस्त

एका मीडिया हाउसला दिलेल्या मुलाखतीत जरीना म्हणाल्या की, ‘कंगना माझ्या नवऱ्यासोबत साडेचार वर्ष नात्यात होती. अशावेळी मी तिला माझ्या मुलीसारखी आहे असं कसं म्हणू?’ सिमरन सिनेमाच्या प्रमोशनदरम्यान कंगनाने आदित्य पांचोलीवर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. यावेळी कंगनाने जरीनाकडे मदत मागितली होती पण तिने मदत करण्यास नकार दिल्याचं कंगनाने सांगितलं होतं. कंगना रणौतने मुंबई वर्सोवा पोलीस ठाण्याला ई-मेलही केला होता. यात तिने 13 वर्षांपूर्वी झालेल्या मारहाण आणि लैंगिक शोषणाचा उल्लेख केला होता.

हेही वाचा- VIDEO- ...म्हणून कार सोडून चालत जिममध्ये पोहोचली जान्हवी कपूर

दरम्यान, आदित्य पांचोलीने कंगना रणौतच्या विरुद्ध मानहानीचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी बोलताना आदित्य म्हणाला होता की, ‘कंगना माझ्याविरुद्ध षडयंत्र रचत आहे. वर्सोवा पोलीस अधिकारी नोटीस घेऊन जेव्हा माझ्या घरी पोहोचले होते तेव्हा मला आश्चर्याचा धक्काच बसला होता.’

VIDEO :जेव्हा सलमान खानने गायलं, 'गच्ची वरून कशी दिसते..'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 14, 2019 08:44 AM IST

ताज्या बातम्या