विराटसाठी काहीपण! त्याला भेटता यावं म्हणून अनुष्का करतेय तारेवरची कसरत

विराटसाठी काहीपण! त्याला भेटता यावं म्हणून अनुष्का करतेय तारेवरची कसरत

बीसीसीआयच्या नियमावलीनुसार एखाद्या मालिकेदरम्यान, खेळाडूंच्या पत्नी त्यांच्यासोबत फक्त 15 दिवसच राहू शकतात. अनुष्काही या नियमांचं पालन करणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 जून- सध्या संपूर्ण भारतात क्रिकेट विश्वचषकाचीच हवा सर्वत्र पाहायला मिळत आहे. पावसामुळे आतापर्यंत जवळपास चार सामने रद्द झाले हेत. एककीकडे क्रिकेटप्रेमी आयीसीसीला सोशल मीडियावर खडे बोल सुनावत आहेत तर दुसरीकडे वरुणराजाने थोडी विश्रांती घ्यावी यासाठी साकडंही घालत आहेत. या साऱ्या वातावरणात भारतीय क्रिकेट संघाचा उत्साहही शिगेला आहे. अर्थात त्यामागे कारणही तसंच आहे. सुरुवातीपासून विजयी रथाचा हा वेग कायम ठेवण्यासाठी भारतीय क्रिकेट संघ प्रयत्नांत आहे. विराट कोहलीच्या याच संघाला पाठिंबा देण्यासाठी म्हणून त्याची पत्नी, अभिनेत्री अनुष्का शर्मासुद्धा साहेबांच्या देशात रवाना होणार आहे.

हेही वाचा- ब्रेकअप होताच सलमानची अभिनेत्री पडली एकटी

‘डीएनए’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार सध्या अनुष्का आगामी सिनेमांच्या कामात व्यग्र आहे. पण यातूनही वेळात वेळ काढून ती विश्वचषकाच्या निमित्ताने परदेशी रवाना होण्याच्या तयारीत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जाहिराती आणि विविध चित्रीकरणांमध्ये अतिशय व्यग्र असणारी अनुष्का तिची उरलेली कामं संपण्याच्या घाईत आहे. सध्या दोन ब्रँडच्या जाहिरातींसाठी तिला सहा ते सात दिवस काम करायचं आहे. त्यानंतर प्रिन्ट कॅम्पेनसाठीही तिला वेळ राखून ठेवायचा आहे.

हेही वाचा- बॉलिवूडचे 4 सेलिब्रिटी जे एकटेच सांभाळतायेत आई- बापाची जबाबदारी

या सगळ्या कामात तिने विराटसाठीही वेळ राखून ठेवला आहे. क्रिकेट विश्वचषकामध्ये ती फक्त भारतीय संघाला प्रोत्साहनच देणार नाही आहे, तर पती विराट कोहलीसोबत काही निवांत वेळही व्यतीत करणार आहे. दरम्यान, बीसीसीआयच्या नियमावलीनुसार एखाद्या मालिकेदरम्यान, खेळाडूंच्या पत्नी त्यांच्यासोबत फक्त 15 दिवसच राहू शकतात. अनुष्काही या नियमांचं पालन करणार आहे. त्यामुळे तिने या सुट्टीची आखणी विचारपूर्वक पद्धतीने केली आहे. यात तिने स्वतःच्या कामाचा समतोल साधत विराटलाही वेळ देता येईल असं नियोजन केलं आहे. तसेच या दोन्हीमध्ये बीसीसीआयच्या कोणत्याही नियमांचं उल्लंघन होणार नाही याची काळजी तिने घेतली आहे.

हेही वाचा- आदित्यची पत्नी म्हणाली, ‘माझ्या नवऱ्याला डेट करायची कंगना, तिला मुलगी कशी मानू?’

VIDEO : नानांना क्लीन चिट; तनुश्री म्हणते, पोलीसच भ्रष्टाचारी!

First published: June 14, 2019, 12:57 PM IST

ताज्या बातम्या