• Home
 • »
 • News
 • »
 • entertainment
 • »
 • सलमानचा ‘दबंग’ अवतार, भरगर्दीत स्वतःच्याच बॉडीगार्डच्या कानशिलात लगावली, Video Viral

सलमानचा ‘दबंग’ अवतार, भरगर्दीत स्वतःच्याच बॉडीगार्डच्या कानशिलात लगावली, Video Viral

प्रीमिअरला बॉलिवूडचे अनेक नावाजलेले स्टार आले होते. पण, यावेळी असं काही झालं की सलमानला त्याचा राग अनावर झाला आणि त्याने स्वतःच्याच बॉडीगार्डच्या कानशिलात लगावली.

 • Share this:
  मुंबई, 05 जून- सलमान खानचा भारत सिनेमा ईदच्या दिवशी आज प्रदर्शित झाला. याआधी मंगळवारी भारतचं स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आलं होतं. या प्रीमिअरला बॉलिवूडचे अनेक नावाजलेले स्टार आले होते. पण, यावेळी असं काही झालं की सलमानला त्याचा राग अनावर झाला आणि त्याने स्वतःच्याच बॉडीगार्डच्या कानशिलात लगावली. विरल भयानीने त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला होता. मात्र थोड्यावेळाने त्याने ही पोस्ट डिलीट केली. मात्र तोवर सोशल मीडियावर अनेक ठिकाणी हा व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्ये सलमान प्रीमिअरला जाण्यासाठी निघाला असता त्याला पाहण्यासाठी गर्दी जमा झाली होती. या गर्दीतून सलमानल सुरक्षित काढण्यासाठी त्याचे बॉडीगार्ज चाहत्यांना धक्का देत पुढे जात होते. व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीनुसार, तिथे अनेक लहान मुलंही होती. आपल्या बॉडीगार्डमुळे मुलांना झालेला त्रास पाहून सलमानला प्रचंड राग आला. सलमान खानच्या एण्ट्रीवर थिएटरमध्ये वाजल्या शिट्ट्या, लोकांनी उडवले पैसे ... म्हणून नेहमी सलमान खानचा फोटो खिशात घेऊन फिरतो 'हा' प्रसिद्ध अभिनेता व्हिडिओमध्ये सलमान आपल्या बॉडीगार्डवर भडकताना आणि त्याच्या कानशिलात लगावतना दिसत आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. सुरुवातीला हा व्हिडिओ जुना असल्याचं म्हटलं जात होतं. मात्र भिंतींवर असलेल्या भारत सिनेमाच्या पोस्टरने हा व्हिडिओ मंगळवारचा असल्याचं सिद्ध झालं. सध्या सलमानच्या भारत सिनेमाला भन्नाट रिस्पॉन्स मिळत आहे. त्याचे आतापर्यंतच्या सिनेमांचे रेकॉर्ड भारत सिनेमा मोडेल असं म्हटलं जात आहे. दरम्यान, या सिनेमाचे रिव्ह्यू चांगले येत असून सिनेव्यापार तज्ज्ञांच्या मते हा सिनेमा चांगला गल्ला कमवेल. मुंबईत सकाळपासून अनेक थिएटरसमोर हाऊसफुल्लचा बोर्ड लागलेला दिसत आहे. सिनेमा पाहून आलेला प्रत्येक प्रेक्षक सलमानच्या या सिनेमाचं भरभरून कौतुक करत आहे. Bharat Public Review- अ‍ॅक्शन नाही तर रडवतो सलमानचा ‘भारत’ VIDEO: मुंबई-पुणे महामार्गावर वाहतूक कोंडी, 5 किमीपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा
  First published: