Home /News /entertainment /

Bappi Lahiri Demise: आधी लतादीदी आणि आता बप्पी दा.. 2 आठवड्यात 'मायलेका'च्या या जोडीचा जगाला निरोप

Bappi Lahiri Demise: आधी लतादीदी आणि आता बप्पी दा.. 2 आठवड्यात 'मायलेका'च्या या जोडीचा जगाला निरोप

Bappi Lahiri Demise: गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar Death) यांच्या निधनाला दोन आठवडेही उलटले नाहीत. त्यापूर्वीच भारतीय संगीत क्षेत्रातील (Indian Music Industry) आणखी एक तारा निखळला आहे.

मुंबई, 16 फेब्रुवारी: गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar Death) यांच्या निधनाला दोन आठवडेही उलटले नाहीत. त्यापूर्वीच भारतीय संगीत क्षेत्रातील (Indian Music Industry) आणखी एक तारा निखळला आहे. भारतामध्ये डिस्को म्युझिकला (Disco Music) नवी ओळख मिळवून देणारे महान गायक आणि संगीतकार बप्पी लहिरी (Bappi Lahiri Death) यांचं आज (16 फेब्रुवारी 2022) निधन झालं. त्यांनी वयाच्या 69व्या वर्षी मुंबईतील क्रिटिकेअर हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास घेतला. लतादीदींच्या निधनानंतर बप्पीदांनी सोशल मीडियावर एक फोटो शेअर करत लतादीदींना आई म्हणत श्रद्धांजली अर्पण केली होती. आता बप्पी लहिरींच्या जाण्याने 15 दिवसांच्या आतच देशानं संगीत क्षेत्रातील दिग्गज आई आणि मुलाची जोडी गमावल्याचं म्हटलं जात आहे. स्वर्गीय लता मंगेशकर यांना बप्पी दा आपली सपोर्ट सिस्टीम मानत होते. 'दादू' या बंगाली चित्रपटातील त्यांच्या पहिल्या रचनेला लता मंगेशकर यांनी आवाज दिला होता. आमीर खानचे वडील ताहिर हुसेन (Tahir Hussain) यांचा 'जख्मी' हा बॉलिवूडपट लाहिरींसाठी पहिला हिट चित्रपट ठरला होता. याच चित्रपटात लतादीदींनी 'अभी-अभी थी दुष्नामी' आणि 'आओ तुझे चांद पे ले जाऊ' ही गाणी गायली आहेत. दोन्ही गाणी खूप हिट ठरली होती. हे वाचा-Bappi Lahiri यांच्या गळयात दागिने पाहून राजकुमार यांनी उडवली होती खिल्ली लतादीदींना वाहिली होती श्रद्धांजली कोविड (COVID-19) आणि न्यूमोनिया (Pneumonia) झाल्यानंतर भारतरत्न लता मंगेशकर यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. 6 फेब्रुवारी रोजी मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचं निधन झालं. आपली सपोर्ट सिस्टीम आणि ज्येष्ठ गायिका असलेल्या लतादीदींच्या निधनानं दु:खी झालेल्या बप्पीदांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर एक जुना आणि अतिशय खास फोटो पोस्ट केला होता. त्या फोटोला त्यांनी 'माँ' (Maa) असं कॅप्शन दिलं होतं. लतादीदींनी बप्पीदांना दिल्या होत्या वाढदिवसाच्या शुभेच्छा सोन्याचे दागिने वापरण्याचे शौकीन असलेल्या बप्पीदा यांनी गेल्या वर्षी (2021) नोव्हेंबरमध्ये आपला 69वा वाढदिवस (Bappi Lahiri Birthday) साजरा केला होता. त्यांना शुभेच्छा देणाऱ्यांच्या यादीत लता दीदींचंही नाव होतं. लता दीदींनी सोशल मीडियावर (Social Media) एक जुना फोटो शेअर करून बप्पीदांना शुभेच्छा दिल्या होत्या. 'हॅपी बर्थडे बप्पी. देव तुम्हाला नेहमी निरोगी आणि आनंदी ठेवो,' असं कॅप्शन त्या फोटोला दिलं होतं. हे वाचा-Bappi Lahiri एकमेव संगीतकार ज्यांना मायकल जॅक्सनने दिलं होतं आमंत्रण लतादीदी आणि बप्पीदांनी अनेक चित्रपटांसाठी एकत्र काम केलं होतं. लता दीदींच्या निधनानंतर अवघ्या काही दिवसांतच बप्पीदांनीदेखील अखेरचा श्वास घेतला आहे. दोघांच्या पाठोपाठ निधनानं संगीत क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
First published:

Tags: Lata Mangeshkar - लता मंगेशकर

पुढील बातम्या