जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / Bappi Lahiri यांना होती सोन्याच्या दागिन्यांची आवड, पहिल्यांदा पाहून राजकुमार यांनी अशी उडवली होती खिल्ली

Bappi Lahiri यांना होती सोन्याच्या दागिन्यांची आवड, पहिल्यांदा पाहून राजकुमार यांनी अशी उडवली होती खिल्ली

Bappi Lahiri यांना होती सोन्याच्या दागिन्यांची आवड, पहिल्यांदा पाहून राजकुमार यांनी अशी उडवली होती खिल्ली

बप्पी दा इंडस्ट्रीत ‘गोल्ड मॅन’ (Gold Man) या नावाने प्रसिद्ध होते. त्यांना सोन्याच्या दागिन्यांची किती आवड होती सर्वांनाच माहीत आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

मुंबई,16  फेब्रुवारी-   बॉलिवूडला  (Bollywood)  अनेक सुपरडुपर हिट गाणी देणारे संगीतकार आणि गायक बप्पी लहिरी   (Bappi Lahiri)  यांचं आज निधन झालं आहे. लता मंगेशकर यांच्या निधनानंतर काही दिवसांनीच बॉलिवूडने आणखी एक मौल्यवान हिरा गमावला आहे. आज सकाळी मुंबईतील क्रिटिकेअर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बप्पी लाहिरी यांच्या निधनानंतर बॉलिवूडमध्ये शोककळा पसरली आहे.बप्पी दा इंडस्ट्रीत ‘गोल्ड मॅन’ (Gold Man)  या नावाने प्रसिद्ध होते. त्यांना सोन्याच्या दागिन्यांची किती आवड होती सर्वांनाच माहीत आहे. पण एकेकाळी याच कारणामुळे बॉलिवूड अभिनेता राज कुमारने   (Raj Kumar)  त्यांची खिल्ली उडवली होती. बप्पी लाहिरी हे शांत स्वभावाचे होते. सुपरस्टार राज कुमारसोबत त्यांची पहिली भेट एका पार्टीदरम्यान झाली होती. बप्पी लाहिरी यांना सोन्याच्या दागिन्यांची प्रचंड आवड होती. त्यामुळे या पार्टीतही ते दागिने घालून पोहोचले होते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दागिन्यांनी लादलेले बप्पी लहिरी एका पार्टीत पोहोचले होते. तिथे अभिनेते राजकुमारसुद्धा उपस्थित होते. बप्पी दा यांना पाहून राज कुमारने त्यांची खिल्ली उडवलीसुद्धा उडवल्याचं म्हटलं जातं. राजकुमार यांनी बप्पीदांचे दागिने बघून म्हटलं होतं, “फॅन्टॅस्टिक, तुम्ही एक एक दागिना घातला आहात फक्त मंगळसूत्र कमी आहे. ते घातलं तरी छान दिसेल’.” राज कुमार यांचा हा विनोद बप्पी लहिरींना अजिबात पसंत पडला नव्हता. परंतु त्यांनी पार्टीतील वातावरण पाहून काहीही बिघडू नये यासाठी त्या सर्व गोष्टी गंमत म्हणून घेतल्या आणि सोडून दिल्या. बप्पी लहिरी या नावाने प्रसिद्ध असणाऱ्या या महान गायकाचं नाव अलोकेश लहिरी असं होतं. त्यांना पॉप सांगितला देशात एका वेगळ्या उंचावर नेऊन पोहोचवलं होतं.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात