मुंबई, 16 फेब्रुवारी- गेल्या आठवड्यातच गानकोकिळा लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचं निधन झालं होतं. त्यांच्या जाण्याने संपूर्ण देश शोक सागरात बुडाला आहे यातून अजून कोणीही सावरलं नसताना चाहत्यांना आणखी एक मोठा धक्का बसला आहे. संगीतसृष्टीत आणखी एक पोकळी निर्माण झाली आहे. नुकतंच ज्येष्ठ गायक आणि संगीतकार बप्पी लहिरी (Bappi Lahiri) यांचं निधन झालं आहे. बप्पी लहिरी यांना भारतीय संगीतसृष्टीतील पॉप सॉन्ग तसेच डिस्को सॉन्गसाठी खास करून ओळखलं जातात. त्यांच्या भारदस्त आवाजाने प्रत्येक व्यक्ती थिरकू लागतो. बप्पी लहिरींचा जन्म २७ नोव्हेंबर १९५२ मध्ये बंगाल, कोलकत्ता येथे झाला होता. त्यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षात तबला वादन शिकायला सुरुवात केली होती. ते एका संगीत क्षेत्रातील कुटुंबाशी निगडित होते. त्यांचे आईवडील एक प्रसिद्ध बंगाली गायक होते. तर प्रसिद्ध गायक किशोर कुमार हे त्यांचे मामा होते. त्यामुळे त्यांना गायनाची गोडीअसणं हे साहजिक होतं. मायकल जॅक्सन आणि बप्पी लहिरी- बप्पी लहिरी यांच्यामुळे भारतीय संगीतसृष्टीत एका नव्या कौशल्याची भर पडली होती. त्यांच्या पॉप गाण्यांनी प्रेक्षकांना प्रचंड भुरळ पडली होती. प्रेक्षक त्याकडे प्रचंड आकर्षित होत होते. त्यांच्यामुळे प्रेक्षकांना डिस्को सॉन्गची गोडी लागली. हे झालं चाहत्यांचं पण तुम्हाला माहिती आहे का? सर्वांना वेड लावणारा स्टार मायकल जॅक्सन यांनासुद्धा बप्पीदांची भुरळ पडली होती. मायकल जॅक्सनने आपल्या लाईव्ह शोमध्ये बोलावलेले बप्पीदा हे पहिले गायक होते. १९९६ मध्ये मुंबईमध्ये मायकल जॅक्सनचा हा लाईव्ह शो पार पडला होता. बप्पी लहिरींचं निधन- बप्पी लहिरी यांचं निधन मुंबईतील क्रिटिकेअर रुग्णालयात झालं आहे. रुग्णालयाचे संचालक डॉ दीपक नामजोशी यांनी पीटीआयला सांगितलं की, बप्पी लहिरी यांच्यावर गेल्या एक महिन्यापासून रुग्णालयात उपचार सुरु होते. महिन्याभरापूर्वी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर सोमवारी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र मंगळवारी त्यांची प्रकृती अचानक बिघडली. यानंतर कुटुंबीयांनी डॉक्टरांना घरीच बोलावण्यासाठी फोन केला होता. नंतर त्यांना पुन्हा एकदा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यांना आरोग्याच्या अनेक समस्या होत्या. ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप एपनियामुळे मंगळवारी रात्री त्यांचं निधन झालं
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.