मुंबई, 09 डिसेंबर : सब टीव्हीवरील 'बालवीर' ही मालिका घराघरात लोकप्रिय होती. या मालिकेने लहान मुलांचे खूप मनोरंजन केले. भारताचा हा सुपरहिरो प्रेक्षकांना खूप भावला. या मालिकेत 'बालवीर' ही भूमिका अभिनेता देव जोशी याने साकारली होती. त्याने 'बालवीर'ची भूमिका अजरामर करून ठेवली आहे. हा अभिनेता लहान मुलांमध्ये खूपच लोकप्रिय आहे. एवढंच नाही तर सोशल मीडियावर देखील या अभिनेत्याचं फॅन फॉलोईंग जबरदस्त आहे. आता हा बालवीर फेम देव जोशीने खऱ्या आयुष्यात कौतुकास्पद कामगिरी केली आहे. हा अभिनेता थेट चंद्रावर झेप घेणार आहे.
जपानी अब्जाधीश युसाकू माएझावा यांनी 'डिअरमून' ही चांद्रमोहीम आखली आहे. 2023 स्पेसएक्स रॉकेटमधून ८ लोकांची या मोहिमेसाठी निवड झाली आहे. 'डिअरमून' मोहिमेवर त्यांंच्यासोबत जाणार्या आठ क्रू सदस्यांची नावे नुकतीच जाहीर झाली आहेत. त्यात बालवीर फेम अभिनेता देव जोशी हा चंद्रावर जाणाऱ्या 8 भाग्यवान व्यक्तींपैकी एक असणार आहे. त्याने सोशल मीडियावर पोस्ट करत याविषयी माहिती दिली आहे.
हेही वाचा - Harshaali Malhotra : बजरंगी भाईजानची मुन्नी आता दिसतेय अशी; पाहून बसणार नाही विश्वास
'डिअरमून' मोहिमेविषयी माहिती देताना देव जोशीने लिहिलंय कि, '' मला काय वाटत आहे हे मी शब्दात व्यक्त करू शकत नाही, पण भावना शब्दांचाही पलीकडच्या आहेत.....#dearMoon च्या अशा विलक्षण, अविश्वसनीय, आयुष्यात एकदाच येणाऱ्या प्रकल्पाचा भाग असल्याचा मला अभिमान आहे. आयुष्याने मला नेहमीच नवीन संधी देऊन आश्चर्यचकित केले आहे आणि मी कधीही विचार करू शकत असलेली ही सर्वात मोठी संधी आहे!''
View this post on Instagram
तो पुढे पाहतोय कि, ''जगाच्या कानाकोपऱ्यातील माझ्या सर्व हितचिंतक, चाहते आणि मित्रांनी मला आणि माझ्या कुटुंबाला पाठिंबा आणि आशीर्वाद दिल्याबद्दल धन्यवाद. या युनिव्हर्सल प्रोजेक्टमध्ये जागतिक स्तरावर माझा सुंदर देश भारताचे प्रतिनिधित्व करताना मला अभिमान वाटतो. आता शेवटी मी म्हणू शकतो कि मी चंद्रावर जात आहे.''
त्याच्या या पोस्टवर चाहते अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत. त्याची हि बातमी ऐकून चाहते खूपच खुश झाले आहेत. चंद्राच्या भोवती प्रवास करणाऱ्या या डिअरमून मिशनमध्ये वेगवेगळ्या देशातील आणि विविध क्षेत्रातील आठ सदस्यांचा समावेश असणार आहे. अनेक मुलाखती, वैद्यकीय तपासण्या आणि भेटीनंतर स्पेसएक्सच्या स्टारशिपवर चंद्राच्या या विलक्षण प्रवासात हे सद्स्य सहभागी होणार आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood actor, Entertainment, Tv actor, Tv serial