जाहिरात
मराठी बातम्या / मनोरंजन / ती मुंबईत नवरा कोलकत्यात; अखेर लग्नाच्या 10 वर्षांनी आई होणार 'बालिका वधू' फेम अभिनेत्री

ती मुंबईत नवरा कोलकत्यात; अखेर लग्नाच्या 10 वर्षांनी आई होणार 'बालिका वधू' फेम अभिनेत्री

नेहा मार्दा

नेहा मार्दा

ती मुंबईत आणि नवरा कोलकत्त्यात असताना खडतर प्रवासानंतर अखेर दोघांच्या आयुष्यात आई वडील होण्याचं सुख आलं आहे. बालिका वधू फेम अभिनेत्रीनं प्रेग्नंसी न्यूज सर्वांबरोबर शेअर केली आहे.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

मुंबई, 24 नोव्हेंबर : काही दिवसांआधीच अभिनेत्री आलिया भट्टनं मुलीला जन्म दिला. त्यानंतर अभिनेत्री बिपाशा बासू देखील आई झाली.अशातच आता आणखी एका टेलिव्हिजन अभिनेत्रीनं चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे.  बालिका बधू या प्रसिद्ध टेलिव्हिजन मालिकेला प्रेक्षकांनी प्रचंड प्रतिसाद दिला. बालिका वधूमधील अभिनेत्री नेहा मार्दानं चाहत्यांना गुड न्यूज दिली आहे. अभिनेत्री नेहा मार्दा लवकरच आई होणार आहे. नेहानं नवऱ्याबरोबरचा फोटो शेअर करत प्रेग्नंट असल्याची माहिती दिली आहे. बेबी फ्लॉन्ट करणारा फोटो पाहून नेहाला तिच्या चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहे. नेहासाठी हा क्षण खूप महत्त्वाच आहे. लग्नाच्या तब्बल 10 वर्षांनी नेहा आणि आयुष्मान यांच्या आयुष्यात बाळाची एंट्री होणार आहे. नेहानं प्रेग्नंसीची बातमी देत पोस्ट लिहिली आहे. तिनं संस्कृत श्लोकानं पोस्टची सुरूवात केली आहे. नेहानं म्हटलंय, ‘श्री शिवाय नमस्तुभ्यम. अखेर देव माझ्यात आले. बाळ 2023मध्ये येणार आहे’. नेहानं नवऱ्याबरोबर खास फोटोशूट शेअर केलं आहे. रेड गाऊनमध्ये क्यूट बेबी बंप फ्लॉन्ट करताना नेहा दिसत आहे. नेहाच्या चेहऱ्यावर प्रेग्नंसी ग्लो दिसून येत आहे. हेही वाचा - सतत शालिनच्या मागे मागे करणारी Bigg Boss 16मध्ये चर्चेत आलेली सुंबूल तौकीर खान आहे तरी कोण?

जाहिरात

नेहानं 2012मध्ये बिझनेसमन आयुष्मान अग्रवालबरोबर लग्न केलं. आयुष्मान पटना येथे राहतो. तर नेहा कामानिमित्त मुंबईत असते. दोघांच्या लग्नाला दहा वर्ष झाली आहेत. नेहाचा जन्म हा कोलकत्ता येथील आहे. नेहासोनी टिव्हीवरील बूगी वूगीची स्पर्धक आहे.  2004मध्ये विजेती झाली होती. त्यानंतर तिला बालिका वधू ही मालिका मिळाली ज्यात ती गहना ही भूमिका करत होती. मालिकेतील तिची भूमिका इतकी सुंदर होती की भूमिकेनं तिला नवी ओळख निर्माण करून दिली. देशातील प्रत्येक घरात नेहा ओळखली जाई लागली. नेहानं 2012मध्ये लग्न झाल्यानंतर टेलिव्हिजनवर काम करणं बंद केलं नव्हतं. ती मुंबईत मालिकेचं शुटींग करायची तर नवरा पटनामध्ये नोकरी. मग सुट्टीच्या दिवशी नेहा नवऱ्याला भेटण्यासाठी पटणाला जायची. नेहा सोशल मीडियावर सक्रीय असते. अनेक व्हिडीओ ती शेअर करत असते.

News18लोकमत
News18लोकमत

बालिका वधूप्रमाणे नेहानं ‘डोली अरमानो की’, ‘एक हजारो मे मेरी बहना हैं’, ‘देवो के देव महादेव’ सारख्या अनेक मालिका केल्या आहेत. प्रत्येक मालिकेत तिनं केलेलं काम प्रेक्षकांना आवडलं.  सोशल मीडियावर नेहाची चांगली फॅन फॉलोविंग असून जवळपास 784k लोक तिला फॉलो करतात.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात