मुंबई, 21 मार्च : बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांची मुलगी सोनम काही दिवसांपूर्वीच लंडनवरुन भारतात परतली आहे. सोनमनं काही दिवसांपूर्वी शेअर केलेल्या एका व्हिडीओमध्ये ती सध्या होम क्वारंटाईनमध्ये असल्याची माहिती दिली होती. तसेच ती आणि तिचा नवरा कोरोनापासून सुरक्षित असल्याचंही तिनं म्हटलं होतं. पण आता सोनम प्रेग्नन्ट असून अनिल कपूर लवकरच आजोबा होणार असल्याचं बोललं जात आहे. सोनम कपूरचे असे काही फोटो सध्या इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत त्यावरुन सोनम प्रेग्नन्ट असल्याच्या चर्चा होत आहे. मात्र सोनमनं याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. सोनम कपूरबाबत सध्या सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत. स्पॉटबॉय-ईनं दिलेल्या वृत्तानुसार सोनम कपूरचे असे काही फोटो समोर आले आहेत ज्यात तिचा बेबी बंप दिसत असल्याचं बोललं जात आहे. या फोटोंमध्ये सोनम व्हाइट कलरच्या नाइट वेअरमध्ये दिसत आहे. हे फोटो पाहिल्यावर सोनम प्रेग्नन्ट असल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.
…म्हणून आमिर खाननं राणी मुखर्जीची फोनवरुन मागितली माफी
काही काळापूर्वी सोमनचा एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यातील हे फोटो आहेत. यात होम क्वारंटाईन दरम्यान सोनम तिच्या सासूसोबत बंद खिडकीतून बोलत असल्याचं दिसत आहे. स्पॉटबॉयनं दिलेल्या वृत्तानुसार सोनम कपूर मागच्या काही दिवसांपासून कोणत्याही पब्लिक इव्हेंटमध्ये दिसलेली नाही. याशिवाय ती सोशल मीडियापासूनही दूर आहे. त्यामुळे सोनमच्या प्रेग्नन्सीच्या शक्यता आहेत.
फ्रेंड्ससोबत आलिया करत होती TikTok Video, पण झाली ‘गलती से बिग मिस्टेक’
जर या सर्व गोष्टी खऱ्या असतील तर सोनम लवकरच आई होणार आहे आणि अनिल कपूर आजोबा. मात्र स्वतः सोनम याबाबत अद्याप काहीही बोललेली नाही. सध्या तरी ती होम आयसोलेशनमध्ये आहे. तिच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं तर ती शेवटची द झोया फॅक्टरमध्ये दिसली होती. त्यानंतर तिनं कोणताही नवा सिनेमा साइन केलेला नाही त्यामुळे आता प्रेग्नन्सीच्या चर्चांवर सोनम काय प्रतिक्रिया देते याकडे सर्वांच लक्ष लागलं आहे. Corona पॉझिटीव्ह आहे कनिका कपूर, लंडनला जाऊन कोणाला भेटली गायिका